तेरा वर्षापूर्वी आलेला ‘गज गामिनी’ हा शिल्पा शिरोडकरचा शेवटचा चित्रपटात असून, १९८० आणि ९० च्या दशकातले ‘खुदा गवाह’, ‘आंखे’, ‘किशन कन्हैया’, ‘गोपी-किशन’ इत्यादी चित्रपटांसाठी परिचीत असलेली ही अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यामार्फत पुनरागमन करत आहे. टीव्हीवरील ‘एक मुठ्ठी आसमान’ या कार्यक्रमात एका घरकाम करणा-या बाईच्या भूमिकेत ती दिसणार आहे. चित्रपटसृष्टीपासून दूर जाऊन २००२ मध्ये पती अप्रेश रणजीतबरोबर ती लंडनला स्थायिक झाली. या कार्यक्रमात ती कमलाबाईची व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘एक मुठ्ठी आसमा’ ऑगस्टच्या मध्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.