बॉलिवूडची ‘आशिकी गर्ल’ श्रद्धा कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात फार आनंदी दिसत आहे. ‘साहो’ आणि ‘छिछोरे’ या चित्रपटांनंतर श्रद्धाकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. ‘पिंकविला’ या वेबसाइटला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रद्धाने तिच्या मानसिक आजाराविषयी खुलासा केला. गेल्या सहा वर्षांपासून तणावाचा त्रास भोगत असल्याचं तिने सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१३ मध्ये ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिला हा त्रास जाणवू लागला होता. ”चिंताग्रस्त होणे म्हणजे काय हेसुद्धा मला तेव्हा माहीत नव्हतं. आशिकीच्या प्रदर्शनानंतर मला वेदना जाणवू लागल्या होत्या. या वेदनांचं काही शारीरिक निदान होत नव्हतं. डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या पण नेमकं काय झालंय हेच कळत नव्हतं. मला त्या वेदना कशामुळे होत आहेत हेच समजत नव्हतं. हा चिंताग्रस्त झाल्यामुळे जाणवणारा त्रास होता. आजही मला त्याचा त्रास जाणवतो पण माझ्यात बरीच सुधारणा झाली आहे. तुम्हाला कुठेतरी त्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. स्वीकार केल्यास बऱ्याच गोष्टी समजण्यास सोप्या होतात. मग ते तणावग्रस्त होण्याच्या बाबतीत असो किंवा आणखी काही,” अशा शब्दांत श्रद्धाने तिच्या भावना व्यक्त केल्या.

पाहा फोटो : ९०चं दशक गाजवणाऱ्या महिमाला आता ओळखणंही कठीण

‘साहो’ आणि ‘छिछोरे’नंतर ‘स्ट्रीट डान्सर’, ‘बागी ३’ हे श्रद्धाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाल्यास फरहान अख्तरशी ब्रेकअप झाल्यानंतर श्रद्धा आता फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाला डेट करत असल्याची चर्चा आहे. श्रद्धाच्या कौटुंबिक कार्यक्रमानांही रोहनची हजेरी पाहायला मिळते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha kapoor on battling anxiety for 6 years ssv
First published on: 13-09-2019 at 17:13 IST