अभिनेत्री श्वेता त्रिपाठी ‘मिर्झापूर 2’ या आगामी वेब सीरिजमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सीरिजमध्ये श्वेता जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या सीरिजसाठी तयारी करत असताना श्वेताने खरीखुरी बंदूक देखील चालवून पाहली होती. तिने १० दिवसांचं विशेष ट्रेनिंग घेतलं होतं. या ट्रेनिंगदरम्यान जेव्हा तिने पहिल्यांदा बंदूक चालवली तेव्हा त्या आवाजानेच तिचा थरकाप उडाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – १० कलाकार अन् दिवस १००; पाहा ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी होणारे स्पर्धक

‘मिर्झापूर 2’ या वेब सीरिजच्या निमित्ताने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत श्वेताने पहिल्यांदा बंदूक चालवताना आलेला अनुभव सांगितला. ती म्हणाली, “जेव्हा मी पहिल्यांदाच बंदूक हातात धरली होती तेव्हा मी खूप घाबरले होते. दिग्दर्शकांनी मला अॅक्शन सीन शुट करण्यापूर्वी बंदूकीसोबत थोडं ट्रेनिंग घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर स्टंट दिग्दर्शक मनोहर वर्मा यांच्यासोबत मी जवळपास १० दिवस ट्रेनिंग घेतलं. जेव्हा मी पहिल्यांदा बंदुकीचा चाप ओढला आणि त्यातून सुटलेल्या गोळीच्या आवाजामुळे माझा थरकाप उडाला होता. इतकी भीती मला यापूर्वी कधीही जाणवली नव्हती.”

अवश्य पाहा – कोटी कोटींची उड्डाणे… ‘बिग बॉस’च्या आशीर्वादाने करोडपती झालेले सेलिब्रिटी

अ‍ॅमेझॉन प्राइमवर मिर्झापूर 2 या वेबसीरिजचा नवा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. जानसे मारेंगे तभी जी पायेंगे असं गुड्डूभय्या या टिझरमध्ये म्हणतोय. मिर्झापूर ही गाजलेली वेबसीरिज आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहे. २३ ऑक्टोबरपासून मिर्झापूर 2 अर्थात या वेबसीरिजचा दुसरा सिझन भेटीला येतो आहे. कालीन भय्या, मुन्ना भय्या आणि गुड्डू भय्या यांच्यातली जबरदस्त टक्कर या सिझनमध्ये पाहण्यास मिळणार आहे यात काही शंकाच नाही.

पहिल्या सिझनमध्ये गुड्डूला गोळ्या लागल्या आहेत. पण तो वाचला आहे. आता त्याला बदला घ्यायचा आहे. त्याच्या या बदल्याच्या लढाईत त्याच्यासोबत गोलूही असणार आहे. गोलू आणि तिच्या मैत्रिणीनेच गुड्डूला अर्थात अली फजलला वाचवलं आहे. आता नव्या सिझन मध्ये काय काय घडतं ते पाहणं निश्चितच रंजक ठरणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या इन्स्टा पेजवर या सीरिजचा नवा टिझर पाहण्यास मिळतो आहे. त्या टिझरमध्ये गुड्डू आहे जो म्हणतोय की हमारा एकही उद्देश है जानसे मारेंगे, क्योंकी मारेंगे तभी जी पाएंगे..

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shweta tripathi takes gun training mirzapur mppg 94
First published on: 06-10-2020 at 16:29 IST