‘अनामिका-रसिका’ निर्मित, ‘साईसाक्षी’ प्रकाशित ‘लव्हबर्ड्स’ या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग गुरुवारी, ४ जून रोजी दुपारी ३.३० वा. दादरच्या शिवाजी मंदिरात सादर होणार आहे. गिरीश जोशी लिखित-दिग्दíशत आणि विद्याधर जोशी, ओंकार गोवर्धन, केतकी सराफ, मुक्ता बर्वे अभिनित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २५ एप्रिलला माटुंगा येथील यशवंत नाटय़गृहात सादर झाला होता. यातील सगळेच कलाकार अन्य माध्यमांतही व्यग्र असताना या नाटकाचे अवघ्या ४२ दिवसांत हे २५ प्रयोग होत आहेत. पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांनी या नाटकास गर्दी केली. रसिकांप्रमाणेच नाटय़क्षेत्रातील नीना कुळकर्णी, स्वाती चिटणीस, सविता प्रभुणे, मंगेश कदम, संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री, लीना भागवत, सुहास परांजपे, मुग्धा गोडबोले, कादंबरी कदम, राजीव नाईक, संगीतकार- कवी मििलद जोशी, गायिका मनिषा जोशी यांनीही नाटकाचे  कौतुक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silver jubilee of lovebirds play
First published on: 02-06-2015 at 06:57 IST