संवेदनशील कलाकार नेहमीच आव्हानात्मक भूमिकेच्या प्रतिक्षेत असतो व जेव्हा त्याला ती भूमिका मिळते तेव्हा त्या भूमिकेसाठी किती मेहनत घवू नि कीती नको असे त्या कलाकाराला होते.
राजीव पाटील दिग्दर्शित ‘७२ मैल – एक प्रवास’ या चित्रपटातील राधाक्का ही भूमिका साकारताना स्मिता तांबे हिनेदेखिल अशीच भरपूर मेहनत घेतली. एक म्हणजे दहा दिवसात ही कांदबरी तिने वीस वेळा वाचली. तिने आपला फोन बंद ठेवला, लोकांना भेटणे बंद केले, सिनेमा पाहणे बंद केले आणि एक दिवस ती साताराजवळील आपल्या गावी आजीकडे जावून राहिली. त्या गावातील स्त्रीयांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांना समजून घेणे हे तिने सुरू केले. राधाक्का आपल्यात सामावण्यासाठी जे जे करता येईल ते तिने केले. या चित्रपटाची ट्रायल पाहून नानाने तिची स्तुती केली यावरून तिने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत सार्थकी लागली आहे.
मराठीत वेगळ्या भूमिकांचे आव्हान असते, ते पेलण्याचे आव्हान मराठी तारका पेलताता म्हणूनच त्यांना मानाचे पुरस्कार लाभतात. स्मिता तांबेने पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर पारितोषिके पटकावल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको.