लग्नात भरजरी साड्या अथवा पोशाख घालून मिरवायला सगळ्यांनाच आवडते. नेमका हाच धागा पकडून इटलीचे ड्रेस डिझायनर अटेलिअर इटालिया यांनी तब्बल एक कोटी रुपयांचा वधू पोशाख साकारला आहे. वधू पोशाखासाठीच्या एका फोटोशूटसाठी अभिनेत्री-गायिका सोफिया हायातने हा पोशाख परिधान केला होता. सोफियाने परिधान केलेल्या या वधू पोशाखावर हाताने हिऱ्यांची कारागिरी करण्यात आलेली आहे. लंडनमध्ये पार पडलेल्या या खास फोटोशूटसाठी अटेलिअर यांनी हा ड्रेस डिझाईन केला होता. सोफियाने डोक्यावर धारण केलेल्या मुकुटाचे डिझाईन लुइस मारिअटे यांनी साकारले असून, यात अनेक प्रकारच्या मौल्यवान रत्नांचा वापर करण्यात आला आहे. या फोटोशूट दरम्यान सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. फोटोशूट पूर्ण होताच हा ड्रेस आणि मुकुट डिझायनरकडे परत पाठविण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sofia hayat wears a one crore dress for bridal wear shoot in london
First published on: 27-04-2015 at 02:19 IST