बॉलिवूडची ‘खूबसूरत’ अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आहे. हवाईसुंदरी निरजा भानोटच्या जीवनावर आधारित चित्रपटात ती निरजाची भूमिका साकारत आहे. हवाईसुंदरीच्या वेशभूषेतील आपले छायाचित्र सोनमने इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले आहे. या भूमिकेसाठी तिने छोटी केशरचना धारण केली असून, तिचा हा नवीन लूक एकदम हटके आहे. सोनमचा हा नवा अंदाज तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. हवाईसुंदरीप्रमाणे दिसण्यासाठी सोनमने घेतलेली मेहनत बघता चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी ती किती जागृत असते याची प्रचिती येते. निरजा भानोट या हवाईसुंदरीने आपल्या प्राणांची बाजी लावून अपहृत विमानातील प्रवाशांना अतिरेक्यांपासून वाचविले होते.
Hello everyone! This is me as Neerja! in our tribute to Neerja Bhanot. This is my most spe… http://t.co/kmewx92Yif pic.twitter.com/GE9NgAXpkC
— Sonam Kapoor (@sonamakapoor) May 3, 2015
#Neerja #PanAm #flight73 #takingoff http://t.co/jxQUD0D9TI pic.twitter.com/dZCr4ErxhJ
— Sonam Kapoor (@sonamakapoor) April 28, 2015