बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. यातच सुशांतचा अखरेचा ठरलेला चित्रपट दिल बेचारा याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. विेशेष म्हणजे या ट्रेलरला कमी कालावधीत सर्वाधिक व्ह्युज मिळाले आहेत.त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा ट्रेलर ट्रेण्ड होत आहे. इतकंच नाही तर हा ट्रेलर पाहण्याची विनंतीदेखील त्याचे चाहते करत असल्याचं दिसून येत आहे. त्यांमुळे अनेकांनी काही मीम्स शेअर करत हा ट्रेलर नक्की पहा असं म्हटलं आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे अनेक वेळा सध्यस्थितीवर भाष्य करणारे काही मजेशीर तर काही टीका करणारे मीम्स व्हायरल होतात. परंतु, यावेळी व्हायरल होत असलेले मीम्स भावनिकतेने आवाहन करणारे असल्याचं दिसून येत आहे.


दरम्यान, सोशल मीडियावर दिल बेचारावरील मीम्स चांगलेच व्हायरल होत आहेत. हा चित्रपट सुशांतचा अखेरचा ठरल्यामुळे सध्या सर्व या चित्रपटाचीच चर्चा आहे. सुशांतने १४ जून रोजी आत्महत्या करुन त्याचं जीवन संपवलं. मात्र अद्याप तरी त्याच्या आत्महत्येचं खरं कारण स्पष्ट झालेलं नाही.