‘मिस युनिव्हर्स’ हा किताब जिंकून इतिहास रचणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतले आहे आणि त्या दोघींसह सुष्मिताचे आईपेक्षा एक मैत्रीणेचे नाते असल्याचे दिसत आहे. सन २००० मध्ये सुष्मिताने तिची मोठी मुलगी रेने हिला दत्तक घेतले तर २०१०मध्ये धाकटी मुलगी अलिशाला दत्तक घेतले. त्या दोघींसह सुष्मिता नेहमीच फोटो शेअर करत असते. आता सुष्मिताने आणखी एक टिक-टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या टिक-टॉक व्हिडीओमध्ये सुष्मिताची धाकटी मुलगी आलिशा अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटातील ‘वे माही’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आलिशासह तिची मैत्रीणदेखील असल्याचे दिसत आहेत. तसेच हा व्हिडीओ खुद्द सुष्मिताने शूट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सुष्मिताने कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओमध्ये अलिशा आणि तिची खास मैत्रीण अॅलेक्सा यांनी सारखे कपडे परिधान केले आहेत.

काही दिवसांपू्र्वीच ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब जिंकून सुष्मिताला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. हा किताब जिंकणारी सुष्मिता ही पहिली भारतीय महिला आहे. या निमित्त सुष्मिताचा बॉयफ्रेंड आणि तिच्या मुलींनी तिच्यासाठी खास सरप्राइजचे आयोजन केले होते. या सरप्राइजचे फोटो सुष्मिताने सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच फोटो शेअर करताना,”मी नुकतीच दुबईहून आले आणि काही तासातच गोव्याला जाणार होते. माझ्या कुटुंबीयांनी माझ्यासाठी केलेल्या या सेलिब्रेशनची मला काहीच कल्पना नव्हती” असे लिहिले होते. १९९४ साली ‘मिस युनिव्हर्स’चा ‘किताब पटकावल्यानंतर तिने १९९६ साली आलेल्या ‘दस्तक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sens daughter dancing on akshay kumars song ve mahi avb
First published on: 11-06-2019 at 15:58 IST