‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम मिनल म्हणजेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने इन्स्टाग्राम अकाउंट सुरु केले आहे. हटके अंदाजासाठी आणि तिने साकारलेल्या हरहुन्नरी व्यक्तिरेखेसाठी रसिकांच्या मनावर ठसा उमटवत स्वानंदीने तिचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. चाहत्यांमध्ये अगदी थोड्याच काळात बरीच लोकप्रियता मिळवलेल्या स्वानंदीने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट सुरु केल्याची माहिती ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे.
हल्ली अनेक कलाकारांच्या नावाने सोशल मीडियावर बरेच खोटे अकाउंट्सही सुरु असल्यामुळे स्वानंदीने तिच्या पोस्टमध्ये हे तिचे स्वत:चे खरे अकाउंट आहे हे न चुकता नमूद केले आहे. स्वानंदीने तिच्या या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पहिलावहिला फोटो पोस्ट करत इन्स्टाग्राममध्ये पदार्पण केले आहे. थेट सिंगापूरहून तिने केलेली ही पोस्ट पाहता, ‘प्रिस्मा’ आणि त्यासारख्या अनेक अॅप्सची चलती असताना स्वानंदी कोणते धम्माल फोटो पोस्ट करणार याकडेच तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

1st Instagram Upload from My Genuine Account…! 😊😘👍🏻 #original #account #joy #singapore #shoes #pink💗

A photo posted by Swanandi Tikekar Official (@swananditikekar) on

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swanandi tikekar is on instagram
First published on: 31-07-2016 at 14:28 IST