बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखली जाते. ती प्रत्येक विषयावर तिचे मत मांडताना दिसते. बऱ्याचवेळा तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. काही दिवसांपूर्वी कंगनाने आमिर खानचा व्हिडीओ शेअर त्याच्यावर टीका केली होती. पण आता अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत कंगनावर निशाणा साधला आहे.
कंगनाने आमिर खानचा फेक व्हिडीओ शेअर केल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तसेच तिने शेअर केलेल्या व्हिडीओवर अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट केले आहे. तिचे हे ट्विट संध्या चर्चेत आहे. तिने तू थकत कशी नाहीस या आशयाचे ट्विट केले आहे. तसेच त्यासोबत हात जोडल्याचे इमोजी देखील वापरले आहेत.

स्वराचे ट्विट पाहून तिने कंगनावर असलेला राग व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. कारण कंगनाने अनेक वेळा स्वरावर निशाणा साधला होता. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी स्वराने सर्वांना शांत बसण्यास सांगितले तर कंगनाने घराणेशाहीवर वरुन अनेकांवर टीका करण्यास सुरुवात केली होती.
