स्वरा भास्कर सध्या तिचा आगामी सिनेमा ‘अनारकली ऑफ आरा’ या सिनेमामुळे प्रकाशझोतात आली आहे. तिच्या या सिनेमाचा ट्रेलरही गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरमधील तिच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले.  या सिनेमात स्वरा फारच बोल्ड आणि आत्मविश्वास असलेली मुलगी दाखवण्यात आली आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र सध्या ती फार घाबरलेली आहे. ती एवढी घाबरली की ती तिचे सोशल मीडिया अकाऊंटही बंद करण्याचा विचार करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचे झाले असे की, गेल्या आठवड्यात स्वराने शुक्रवारी प्रदर्शित झालेला मोना डार्लिंग हा सिनेमा पाहिला. हा एक सोशल मीडिया थरारक सिनेमा आहे. या सिनेमा पाहिल्यानंतरच स्वरा जास्त घाबरली आहे.

स्वराचे म्हणणे आहे की तिला सोशल मीडियावर दररोज फक्त शिव्याच मिळतात आणि तीन वेळा तर जीवे मारण्याची धमकीही आली आहे. पण याहून जास्त माझ्याबरोबर काही झाले नाही. पण तरीही मोना डार्लिंग बघितल्यानंतर मला माझे सोशल मीडियावरील अकाऊंट बंद करावेसे वाटत आहे.

स्वराचा अनारकली ऑफ आरा हा सिनेमा येत्या २४ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अविनाश दासचे दिग्दर्शन असेलेल्या या सिनेमात स्वरासोबत पंकड त्रिपाठी आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhaskar receives death threat and wants to delete her social account
First published on: 24-02-2017 at 21:19 IST