तमिळ चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता के. भाग्यराजने नुकताच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये महिलांबद्दल वक्तव्य केले आहे. देशभरात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला केवळ पुरुष जवाबदार नसून महिलाही तितक्याच जबाबदार आहेत असे म्हटले आहे.

भाग्यराज यांनी त्यांचा आगमी Karuthukalai Pathivu Sei चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा बंगळूरु येथे आयोजित केला होता. दरम्यान माहिलांवर होण्याऱ्या लैंगिक अत्याचारावर त्यांनी त्यांचे मत मांडले आहे. ‘चुक घडण्यासारखी परिस्थिती महिलाच निर्माण करतात. महिलांनी जर व्यवस्थित वर्तन ठेवले, तर सर्व गोष्टी चांगल्या घडतील. तुम्ही प्रत्येक वेळी मुलांना दोष देऊ शकत नाही’ असे त्यांनी कार्यक्रमामध्ये म्हटले. त्यावर तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी त्यांच्यावर टाळ्यांच्या वर्षाव केला तर अनेकांनी त्यांच्या मतावर नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : बॉलिवूड चित्रपटात झळकणार नागार्जुन, साकारणार ‘ही’ भूमिका

‘एक काळ असा होता जेव्हा महिलांवर बंधने लादली जात होती. परंतु मोबाईल येताच ती बंधने निघून गेली. मोबाईल येईपर्यंत महिला मर्यादेत होत्या. आजकाल महिला सगळीकडे मोबाईलवर बोलताना दिसतात. महिला रस्त्यावरुन जाताना देखील फोनवर बोलत असतात. पण त्या काय बोलत असतील हा प्रश्न माझ्या मनात असतो’ असे पुढे भाग्यराज म्हणाले.