छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील प्रत्येक कलाकार कायमच चर्चेत असतो. ही मालिका गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील जेठालाल आणि बबिता हे विशेष चर्चेत असतात. आता जेठालालने नवी कार खरेदी केल्याचे समोर आले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत जेठालाल ही भूमिका अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारली आहे. आता दिलीप जोशी यांनी दिवाळीमध्ये नवी कार खरेदी केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलीप जोशी यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर कार सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत कुटुंबीय देखील असल्याचे दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी, ‘कियाची सोनेट कार New Home Member’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.