सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गबाई सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधानने शुभ्राची भूमिका साकारत पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे. आता हिच शुभ्रा लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नुकतच तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगाची चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव ‘बबलू बॅचरल’ आहे. या चित्रपटात तेजश्री अभिनेता शर्मन जोशीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. येत्या २० मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन अग्निदेव चॅटर्जी यांनी केले आहे. तेजश्री आणि शर्मनची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

#babloobachelor

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

सध्या तेजश्री ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारत आहे. या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केला आहे. तसेच मालिकेची आगळी वेगळी कथा, गिरीश ओक आणि निवेदीता सराफ यांची जोडी या सर्व गोष्टींमुळे अल्पावधीतच मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून तेजश्री खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली होती. या मालिकेत तिने जान्हवीची भूमिका साकारली होती. त्यावेळी जान्हवी आणि श्री म्हणजेच शशांक केतकर यांची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली होती. एका उत्कृष्ठ मराठमोळ्या सूनेची भूमिका साकारणाऱ्या तेजश्रीची शुभ्राची भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. आता तेजश्री ‘बबलू बॅचरल’ या चित्रपटातून चाहत्यांचे मन जिंकणार का? हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.