मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे नेहमी चर्चेत असते. मालिका, चित्रपट नाटक यांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली. अश्विनी सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियावर आपली मत अश्विनी परखडपणे मांडताना दिसते. नुकत्याच एका मुलाखतीत अश्विनीने बिकनीमुळे ट्रोल होणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रींबाबात भाष्य केलं आहे.

हेही वाचा- Video: अविनाश नारकरांना ट्रोल करणाऱ्यांना पत्नी ऐश्वर्या यांनी सुनावले खडेबोल, म्हणाल्या, “तो माणूस म्हणून…”

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Raj Thackeray and anjali Damania
“ईडीचं चक्र होतं म्हणून…”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दर्शवल्यानंतर अंजली दमानियांचं मोठं विधान
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

गेल्या काही दिवसांपासून बिकनी घाल्यामुळे अनेक मराठी अभिनेत्री ट्रोल झाल्या होत्या. मराठीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियावर बिकनी घातलेले फोटो शेअर केले होते. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. मराठमोळ्या अभिनेत्रींना बिकनीमध्ये बघून नेटकरी चांगलेच नाराज झाले होते. अनेकांनी या फोटोखाली कमेंट करत अभिनेत्रींना ट्रोल केलं होतं. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री अश्विनी महांगडेने बिकनी घातल्यामुळे मराठी अभिनेत्री ट्रोल का होतात याबाबत उत्तर दिलं आहे.

अश्विनी म्हणाली. “ट्रोलर्सच दुकानच वेगळं आहे. पण त्यातलं जर आपण एखादा टक्का विचार केला तर काय होतं ना आपले जे प्रेक्षक आहेत ना त्यांच कलाकारांवर प्रचंड प्रेम आहे. याचा अर्थ काय मराठी प्रेक्षकांना आपल्या मुलींना बिकनीमध्ये नाही बघायचं. कारण ते वेगळ्या लेव्हलच प्रेम करतात. ते मराठी कलाकारांना आपल्या घरातले मानतात. त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना वाटतं बिकनी नका घालू तुम्ही परफॉर्मेंस चांगला द्या.”

हेही वाचा- “Happy Birthday बायको”, विराजस कुलकर्णीची पत्नी शिवानी रांगोळेसाठी खास पोस्ट, लग्नातील फोटो शेअर करत म्हणाला…

अश्विनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत अश्विनीने राणूबाई शिवाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली होती. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातही तिने महत्वाची भूमिका साकारली होती. अश्विनी सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा पात्र साकारत आहे. या पात्राला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.