Premium

Video : ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने भावाबरोबर केला ‘या’ ट्रेडिंग गाण्यावर डान्स, म्हणाली, “पहिल्यांदाच…”

Video : अभिनेत्री रुपाली भोसलेने भावाबरोबर केला डान्स; म्हणाली, “बर्गरच्या बदल्यात…”

aai kuthe kay karte fame rupali bhosale shares first reels video with her brother sanket
'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली भोसले घराघरांत लोकप्रिय झाली आहे. यामध्ये तिने संजना हे पात्र साकारलं आहे. उत्तम अभिनय आणि सौंदर्यच्या जोरावर रुपालीने मराठी कलाविश्वात अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विविध ट्रेंडिंग गाण्यावर रील्स बनवून ती तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करते. सध्या रुपालीने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुपालीने तिच्या भावाबरोबर “गुलाबी शरारा…” या इन्स्टाग्रामवरील ट्रेंडिग गाण्यावर डान्स केला आहे. गुलाबी रंगाची साडी नेसून अभिनेत्रीने हा सुंदर व्हिडीओ बनवला आहे. तिच्या भावाने यापूर्वी कधीच रील व्हिडीओ बनवला नव्हता. त्यामुळे पहिल्यांदाच लाडक्या भावाबरोबर रील करताना रुपालीला प्रचंड आनंद झाला होता.

हेही वाचा : “येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण…”, क्षिती जोग-हेमंत ढोमेच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण, अभिनेता म्हणाला, “लय खुळ्यागत…”

रुपाली भोसले या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “माझा भाऊ संकेतने पहिल्यांदाच रील व्हिडीओजमध्ये पदार्पण केलं. हा व्हिडीओ बनवण्यासाठी मला त्याची खूप वेळ मनधरणी करावी लागली. अखेर बर्गर पार्टीच्या बदल्यात तो हा व्हिडीओ करण्यासाठी तयार झाला. आम्ही दोघांनी केलेल्या स्टेप्स कदाचित सारख्या नसतील पण, हा व्हिडीओ शूट करताना मी प्रचंड आनंदी होते.”

हेही वाचा : “माझी बायको ६ महिन्यांची गरोदर…”, चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुख खानने दिलं ‘असं’ उत्तर, सर्वत्र होतंय कौतुक

दरम्यान, रुपाली भोसलेने शेअर केलेल्या या भावा-बहिणीच्या गोड व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री आपल्या कुटुंबीयांवरचे विविध फोटो, जुन्या आठवणी नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने आजवर बऱ्याच गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तिने हिंदी मालिकांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. शिवाय रुपाली ‘बिग बॉस मराठी’तही झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte fame rupali bhosale shares first reels video with her brother sanket watch video sva 00

First published on: 07-12-2023 at 10:12 IST
Next Story
पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर सुरुची अडारकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…