Premium

खऱ्या आयुष्यात ‘जेठालाल’ खूप उद्धट? चाहत्याने सांगितला दिलीप जोशींचा आलेला अनुभव

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील जेठालाल हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. हे पात्र अभिनेते दिलीप जोशी साकारत आहेत.

dilip-joshi-jethalal

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. हे पात्र अभिनेते दिलीप जोशी साकारत आहेत. पण आता एका चाहत्याने त्यांच्याबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेठालाल या भूमिकेने दिलीप जोशी यांना एक वेगळी ओळख केली. या भूमिकेमुळे त्यांचा चाहतावर्गही प्रचंड वाढला. त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोशल मीडियावरून देखील त्यांचे चाहते त्यांच्याबद्दलचं प्रेम अनेकदा व्यक्त करत असतात. मालिकेमध्ये विनोदी भूमिका साकारणारे दिलीप जोशी खऱ्या आयुष्यात कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते विविध प्रयत्न करत असतात. पण आता त्यांच्या एका चाहत्याने खऱ्या आयुष्यात दिलीप जोशी खूप उद्धट आहेत असं सांगितलं.

आणखी वाचा : जेठालालच्या भूमिकेसाठी दिलीप जोशी नाही तर ‘हा’ अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंती, पण ‘या’ कारणाने नाकारली मालिका

रेडिटवरील एका थ्रेडवर या चाहत्याने हा खुलासा केला. तिथे “कोणता टीव्ही अभिनेता उद्धट आहे आणि असा अनुभव कोणाला आला आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अनेक चाहत्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले. त्यापैकी एकाने ‘जेठालाल’ म्हणजेच दिलीप जोशी यांना उद्धट म्हटलं. त्यांनी त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं पण दिलीप जोशी त्यांच्याशी नक्की कसे वागले होते याबद्दल त्यांनी फारशी माहिती दिली नाही.

हेही वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘भिडे’ एका एपिसोडसाठी आकारतात ‘इतके’ मानधन, आकडा ऐकून व्हाल थक्क

तर आता यावरून सोशल मीडियावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्या चाहत्याच्या या उत्तरावर आश्चर्य व्यक्त केलं. तर अनेक जण दिलीप जोशी यांची बाजू घेऊन भाष्य करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor dilip joshi from tarak mehta ka ooltah chashma is very rude in his real life said fan rnv

First published on: 12-09-2023 at 11:17 IST
Next Story
“तिचा निरोप घेताच…”, आजीच्या निधनानंतर अभिज्ञा भावेची भावुक पोस्ट; म्हणाली, “प्रिय आजी…”