scorecardresearch

Premium

अखेर स्वप्न सत्यात उतरलं! किरण मानेंनी खरेदी केली आलिशान मर्सिडीज; गाडीची खास झलक दाखवत म्हणाले…

किरण मानेंनी या गाडीबरोबर काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

kiran mane
किरण मानेंनी खरेदी केली आलिशान मर्सिडीज

अभिनेते किरण माने यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून खरंतर ते घराघरात पोहोचले. नंतर बिग बॉस मराठी चौथ्या पर्वात त्यांनी आपल्या खेळातून प्रक्षेकांनी मनं जिंकून घेतली. किरण माने सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून ते चाहत्यांना अपडेट देत असतात.

हेही वाचा-

Prarthana-Behere-1
“मी प्रेग्नंट…,” प्रार्थना बेहेरेने केला खुलासा, म्हणाली, “मध्यंतरी एक…”
amir khan new look
Video कुरळे केस, डोळ्यांना चष्मा अन्… मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा नवीन लूक व्हायरल, नेटकरी म्हणाले…
rubina-dilaik
गरोदरपणाच्या घोषणनेनंतर रुबिना दिलैकने शेअर केला बेबी बंपचा फोटो; म्हणाली…
kiran mane shared special post for superstar shah rukh khan
“‘जवान’ला ठरवून डोक्यावर घेतलं”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “भ्रष्ट नेत्यांकडून…”

सध्या किरण माने वेगळ्या कारणानेच चर्चेत आले आहेत. किरण माने यांनी नुकतीच एक नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे. किरण मानेंनी आपल्या नव्या गाडीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. किरण मानेंनी मर्सिडीज बेन्झ गाडी खरेदी केली आहे. मर्सिडीज घेण त्यांच लहानपणापासूनच स्वप्न होतं. अखेर हे स्वप्न सत्यात उतरलं आहे.

हेही वाचा- लाडक्या बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे भावूक; म्हणाली, “पाच दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना…”

किरण माने यांनी नव्या गाडीचा फोटो शेअर करत लिहिलं आहे. ” मित्रांनो ही मोठी गोष्ट नाही. पण मला तुम्हाला हे सांगायच आहे. जेव्हा मी किशोरवयात होतो तेव्हा मर्सिडीज बेन्झ घेण माझं स्वप्न होतं. आता ते स्वप्न सत्यात उतरलं आहे. माझ्या प्रिय मर्सी आमच्या कुटुंबात तुझं स्वागत आहे.” किरण मानेंच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा- “बाकीच्या मंडळांचे देव पण पावतात”, लालबागच्या राजाच्या दर्शनावरून ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीने दिलं उत्तर, म्हणाली…

दरम्यान, किरण माने यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली असून ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor kiran mane purchased brand new mercedes benz car photo share on instagram dpj

First published on: 25-09-2023 at 11:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×