scorecardresearch

Video: “गरबा स्टेप वाटली…” दीपाने ‘बहरला हा मधुमास’वर केलेला डान्स पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

या गाण्याचा ट्रेंड पाहून ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने या गाण्यावर नाच केला.

reshma shinde troll

सध्या सर्वत्र ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची चर्चा आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेख सना शिंदेही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तर सध्या या चित्रपटातील एक गाणं सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. पण या गाण्यावर रील केल्यामुळे अभिनेत्री रेश्मा शिंदे हिची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली.

महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं सध्या सर्वांच्याच ओठांवर आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटी या गाण्यावर रील तयार करून पोस्ट करत आहेत. या गाण्याचा ट्रेंड पाहून ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने देखील या गाण्यावर नाच केला. परंतु तिचा हा नाच अनेकांना आवडला नाही आणि त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.

आणखी वाचा : “मेकअप मॅन बदलला वाटतं…”; ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लग्नातील दीपाच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

रेश्माने काल या गाण्याची हूक स्टेप करत एक रील तयार केलं. गुलाबी रंगाची साडी परिधान करून या गाण्यावर तिने सुंदर डान्स केला. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट करतात खूप व्हायरल झाला. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तिला तिचा हा डान्स आवडल्याचं सांगितलं तर अनेकांनी त्यावरून तिची थट्टा केली.

हेही वाचा : Video: ‘ती’ एक चुक झाली अन् रेश्मा शिंदे आणि अनघा अतुल गोरेगावला जायच्या ऐवजी पोहोचल्या चर्चगेटला, व्हिडीओ व्हायरल

एका नेटकऱ्याने यावर कमेंट करत लिहिलं, “तू जरा जास्तच डान्स केलास.” तर आणखी एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “तू डान्स चांगला केलास पण ती गरबा स्टेप वाटली.” तर आणखी एकाने कमेंट करत लिहिला, “तुझा नाच परफेक्ट नव्हता.” याचबरोबर अनेकांनी यावर कमेंट करत लिहिलं, “तुला खरंच नाही जमलाय हा डान्स.” आता या व्हिडिओमुळे रेश्मा चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 13:18 IST

संबंधित बातम्या