scorecardresearch

Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : हळदीचा सोहळा ते लग्नाच्या विधी, खास मैत्रिणीने शेअर केलेला व्हिडीओ पाहिलात का?

हार्दिक जोशी अक्षया देवधरच्या लग्नातील खास व्हिडीओ

Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : हळदीचा सोहळा ते लग्नाच्या विधी, खास मैत्रिणीने शेअर केलेला व्हिडीओ पाहिलात का?
हार्दिक जोशी अक्षया देवधरच्या लग्नातील खास व्हिडीओ

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी व अक्षया देवधर आज (२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत. मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक आणि अक्षयाच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर आज पुण्यात पारंपारिक पद्धतीने हार्दिक आणि अक्षयाचा विवाह सोहळा पार पडला. याचे बरेच व्हिडीओ व फोटो व्हायरल झाले आहेत. नुकतंच अक्षया देवधरची मैत्रीण वीणा जगताप या नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री वीणा जगताप ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्या बरोबर अभिनेता अमोल नाईक म्हणजेच बरकतही दिसत आहे. या व्हिडीओ त्या दोघांनीही हार्दिक अक्षयाच्या लग्नाची झलक दाखवली आहे. यात ते दोघेही मेहंदीचा कार्यक्रम, हळदी, संगीत हे दाखवताना दिसत आहेत. तर त्यानंतर त्या दोघांनी लग्नाचे ठिकाण पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

वीणाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओखाली #अहा असा हॅशटॅगही पाहायला मिळत आहे. “तुम्हा दोघांना नवीन आयुष्याच्या मनापासून कोटी कोटी शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : Akshaya Hardeek Wedding Live : “नांदा सौख्यभरे…” अक्षया देवधर-हार्दिक जोशीचा विवाहसोहळा संपन्न

दरम्यान हार्दिक अक्षयाने पुण्यात पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. या लग्नाच्या विधींसाठी त्यांनी खास लूक केला होता. अक्षयाने लाला रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. तसेच या लूकसाठी तिने परिधान केलेले दागिने तर विशेष लक्षवेधी आहेत.

पाहा व्हिडीओ –

तर हार्दिकने लाल रंगाचं धोतर नेसलं आहे. त्यावर त्याने क्रिम रंगाचा कुर्ता परिधआन केला आहे. यांचे अनेक फोटोही व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 13:29 IST

संबंधित बातम्या