Arbaz Patel : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून गेल्या आठवड्यात अरबाज पटेलने एक्झिट घेतली. त्याच्या एलिमिनेशनमुळे घरातील सर्वांनाच धक्का बसला होता. पहिल्या दिवसापासून अरबाजने ‘बिग बॉस’च्या घरात जबरदस्त खेळ खेळला होता. त्यामुळे जवळचा मित्र एलिमिनेट होतोय हे पाहून निक्की सुद्धा प्रचंड रडली होती. “आपण एवढ्या लवकर एक्झिट घेऊ असं कधीच वाटलं नव्हतं” असं अरबाजने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. याशिवाय घराचा निरोप घेतल्यावर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे.

अरबाज यापूर्वी MTV स्प्लिट्सव्हिला या शोमध्ये झाला होता. या शोमध्ये त्याचं नायराबरोबर कनेक्शन होतं. मात्र, ते कनेक्शन शोपुरतं मर्यादित राहिलं. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याने ‘कमिटेड’ असल्याचं सांगितलं होतं. परंतु, लीझा बिंद्राशी कमिटेड असूनही अरबाजची निक्कीशी जवळीक वाढली. आता एलिमिनेशनंतर अरबाजला सर्वत्र त्याच्या रिलेशशिपबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. पण, तुम्हाला माहितीये का सर्वत्र चर्चेत असणारा अरबाज पटेल फक्त २५ वर्षांचा आहे.

अरबाजने नुकतीच ‘फिल्मीमंत्रा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. या मुलाखतीत त्याने आयुष्यातील कठीण काळ, आवडत्या व वाईट सवयी यावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “तुझ्यामुळे आज आम्ही…”, घरात आल्या सूरज चव्हाणच्या बहिणी व आत्या; ‘ते’ शब्द ऐकताच सर्वांचेच डोळे पाणावले

अरबाजला व्यसन आहे का?

“तुला कोणतं व्यसन आहे? दारू वगैरे पितोस का?” हा प्रश्न विचारताच अरबाज म्हणाला, “दारू आणि सिगारेटला मी कधीच हात लावला नाहीये. एवढंच काय मी कधीच चहा वगैरे पण पीत नाही. मला फक्त चांगले कपडे घालायचे हा एकच शौक आहे. कारण, ‘जो दिखता है, वही बिकता है’ या मताशी मी सहमत आहे. मला चांगलं जेवण जेवायला आवडतं आणि आता मला नवनवीन पदार्थ बनवायला सुद्धा आवडतील.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi: निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “माझा साखरपुडा…”

आयुष्यात आलेल्या वाईट अनुभवांविषयी अरबाज ( Arbaz Patel ) पुढे सांगतो, “अनेक लोकांनी माझा फक्त फेमसाठी वापर केला…ज्यावेळी माझ्याकडे काहीच नव्हतं, तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा कोणीच नव्हतं. बॉडी बनवायला सुरुवात केल्यावर प्रोटिन्स विकत घेताना अनेकदा माझी फसवणूक सुद्धा झाली आहे. आयुष्यात प्रचंड कठीण काळ बघून मी वर आलोय. त्यामुळे आता जेव्हा माझ्याकडे जास्त पैसा येतो…तेव्हा जास्तीत जास्त पैसे साठवून मी कमीत कमी पैसे खर्च करण्यास प्राधान्य देतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Arbaz Patel
अरबाज पटेल ( Arbaz Patel )

“कोणासमोर हात पसरण्यापेक्षा… मला छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंद घ्यायला आवडेल. कारण, वाईट किंवा चुकीच्या गोष्टींचे शौक ठेवणं मला अजिबातच आवडत नाही.” असं मत अरबाज पटेलने ( Arbaz Patel ) मांडलं.