छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर नेहमी चर्चेत असते. बिग बॉसमुळे ती घराघरात पोहचली. लवकरच सई आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सईने सोशल मीडियावर पोस्ट करत गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली होती. नुकताच सईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातील काही फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा- Video : चाहतीच्या चाळीतल्या घरी पोहोचली ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी! अभिनेत्रीच्या नम्रपणाचं होतंय कौतुक

Two Ladies and boy inside DTC bus over Seat issues shocking video
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; महिलांच्या भांडणामध्ये आलेल्या तरुणानं खाल्ला मार; VIDEO एकदा पाहाच
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
Lalbaugcha raja 2024 darshan mumbai devotees get pushed shoved at lalbaugcha raja amid stampede like situation
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? ‘हा’ VIDEO पाहा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
Mumbai local video of some girls dancing on a marathi song Khandalyachya Ghatat Gadi Chale Zokaat in mumbais local train is going viral
मुंबई लोकलमध्ये “खंडाळ्याच्या घाटात गाडी चाले…” गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल
Giving Amazing poses for photos Cute little girl
“स्माईल प्लिज”, वडिलांच्या मागे दुचाकीवर बसून गोंडस चिमुकली फोटोसाठी देतेय भन्नाट पोझ, Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी सईने पोपटी रंगाची सुंदर साडी नेसली होती. तसेच सईने जांभळ्या रंगाच्या फुलांच्या दागिन्यांनी साज केला होता. सईने आपल्या इन्स्टाग्रामवर या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सईबरोबर तिचा नवरा तीर्थदीप रॉयही दिसत आहे. सईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत सईचे अभिनंदन केलं आहे.

कर्नाटकमधील बेळगाव येथे सई बाळाचे स्वागत करणार आहे. दरम्यान बाळासाठी सईने काही काळासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. सध्या ती तिचा आई होण्याचा प्रवास एन्जॉय करत आहे.

हेही वाचा- Video: कार्तिकी गायकवाडने नवऱ्याबरोबर मिळून खरेदी केली आलिशान कार, नव्या गाडीची खास झलक दाखवत म्हणाली…

सईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने मराठीबरोबर अनेक हिंदी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘किस किसको प्यार करू’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ मधील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातही ती सहभागी झाली होती.