उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याकडे एक ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जाते. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. अमृता फडणवीसांना कलाक्षेत्राची आवड असून त्या उत्तम गायिका आणि समाजसेविकाही आहेत. अमृता फडणवीस या कायमच त्यांचं मत ठामपणे मांडताना दिसतात. नुकतंच देवेंद्र फडणवीसांनी पत्नीच्या मतं मांडण्याबद्दल भाष्य केले.

देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांना पत्नी अमृता फडणवीसांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. “अमृता वहिनी अगदी बेधडक मत मांडतात, कृती करतात. राजकारणात असं फार कमी वेळा दिसतं. एकमेकांना स्पेस दिल्यामुळे तुमची जोडी अगदी अनुरुप वाटते. स्पेस देणं, एकमेकाना समजून घेणं हे तुम्ही कसं काय जमवलं”, असा प्रश्न अवधूत गुप्तेने त्यांना विचारला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.
आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

sudhir mungantiwar on raj thackeray
राज ठाकरेंना नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण का नाही? सुधीर मुनगंटीवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…
Shrikant Shinde
“मुख्यमंत्र्यांनी मला मंत्रीपदाबाबत विचारलं, तर…”; श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका!
chandrashekhar bawankule and jayant patil
“मला बावनकुळेंची काळजी वाटतेय”, फडणवीसांविषयी विचारल्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले…
PM Modi Letter After 45 Hours Meditation
४५ तास ध्यान करताना नरेंद्र मोदींनी काय अनुभवलं? पंतप्रधानांनी स्वहस्ते लिहिलेलं पत्र वाचा, म्हणाले, “माझ्या शरीराचा प्रत्येक कण..”
Yogendra Yadav BJP Win NDA Congress
“मी भाजपाच्या विजयाची भविष्यवाणी…”, योगेंद्र यादव यांनी दिलं स्पष्टीकरण, पुन्हा सांगितलं किती जागा मिळणार
malati joshi
व्यक्तिवेध: मालती जोशी
MP Swati Maliwal
मारहाणीच्या घटनेनंतर खासदारकीचा राजीनामा देणार का? स्वाती मालीवाल म्हणाल्या, “मी…”
Swati Maliwal
मारहाणीच्या घटनेसंदर्भात बोलताना स्वाती मालीवाल भावूक; म्हणाल्या, “माझं काय होईल? माझ्या करिअरचं…”

“मला असं वाटतं की हे काही जमवावं लागत नाही. आम्ही पहिल्या दिवसापासूनच असं ठरवलं होतं की तिने तिचं जीवन जगायचं आणि मी माझं जीवन जगणार. व्यक्ती म्हणून तिची काही मतं आहेत. मला पटतात असं नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा : बजेट फक्त ५ कोटी, कमाई मात्र दहापट; ‘बाईपण भारी देवा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी

“तिची अनेक मतं मला पटत नाहीत. तिच्या अनेक कृतीदेखील मला पटत नाहीत. पण तो तिचा अधिकार आहे. जर तिला इतकं बेधडक वागायचं असेल तर हा त्रास सहन करावा लागेल. कारण आपल्याकडे अजूनही आपण कितीही पुढारलेलं असं म्हटलं तरी महिलांनी इतकी मोकळी मतं मांडणं हे पटत नाही. राजकारण्यांना तर हे अजिबातच पचत नाही.

मी निश्चितपणे सांगतो की तिची मतं मला पटत नाहीत. पण ती मतं मांडण्याचा तिला अधिकार आहे. तो मी कधीही हिरावून घेणार नाही”, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.