‘बिग बॉस’ फेम अभिनेता सुशांत दिवगीकरच्या घरात आग लागल्याची घटना घडली आहे. सुशांतच्या मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी शनिवारी रात्री ११ वाजता आग लागली. या घटनेत सुशांत किंवा त्यांच्या कुटुंबाला काहीही झालेलं नाही, ते सगळे सुखरूप आहेत. मात्र आगीच्या घटनेने त्यांना धक्का बसला आहे.

‘थँक यू फॉर कमिंग’ फेम सुशांत दिवगीकरच्या घरातील एसीमध्ये स्फोट झाला. त्याच्या मॅनेजरने या घटनेची माहिती दिली आहे. “घरातील हॉलमध्ये सगळे जण शनिवारी रात्री जेवण करत असताना एसीमध्ये स्फोट होऊन आग लागली. मग लगेचच ही आग स्वयंपाकघरात आणि ऑफिसमध्ये पसरली. या घटनेत अवॉर्ड्स, घरातील काह उपकरणं, फर्निचर आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जळाली आहे. सुशांतचा मेकअप व त्याचे कपडेही या घटनेत जळाले आहेत,” असं मॅनेजरने सांगितलं.

Video: पहिल्यांदाच दिसला दीपिका पादुकोणचा बेबी बंप; मतदानानंतर गर्दीत पत्नीची काळजी घेताना दिसला रणवीर सिंग

“घरातील बरंच सामान जळालं आहे, सुशांतचं मोठं नुकसान झालं आहे पण सुदैवाने घरातील सर्व सदस्य सुखरुप आहेत. सुशांत सध्या त्याच्या आई-वडिलांच्या घरी राहतो. या घटनेनंतर त्याला मोठा धक्का बसला आहे, घराचे खूप मोठे नुकसान झाले आहे, मात्र कोणत्याही सदस्याला इजा झालेली नाही,” अशी माहिती सुशांतच्या मॅनेजरने दिली.

तमन्ना भाटियाच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, १७ दिवसांपासून करतोय तुफान कमाई; तुम्ही पाहिला का?

सुशांत दिवगीकर ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिॲलिटी शोच्या आठव्या पर्वामध्ये झळकला होता. सुशांतला बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात ऑफर देण्यात आली होती, पण अभिनेत्याने हा शो करण्यास नकार दिला होता. “मी तो शो पुन्हा करू शकत नाही. कारण माझ्याकडे तेवढा संयम नाही. त्या शोमध्ये नेऊन मला बांधून ठेवलं तरी मी तिथून बाहेर येईन. खरं तर या शोने मला त्यावेळेस खूप ओळख मिळवून दिली होती. मला बिग बॉस ओटीटीसाठी पाच ते सहा कॉल आले होते. मला असं वाटत होतं की ‘मला इतके लोक का कॉल करत आहेत?’ मी पाच जणांना नाही म्हणालो, मग मी सहाव्या व्यक्तीला का हो म्हणेन,” असं सुशांत म्हणाला होता. यासंदर्भात ‘ई-टाइम्स’ ने वृत्त दिलं आहे.

“ते गडकिल्ले तुमच्या बापाचे नाहीत”, गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी; म्हणाले, “तुम्ही असले चाळे…”

सुशांत हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याचे फोटो व रील्स इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. अभिनेत्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सुशांत जुलै २०१४ मध्ये मिस्टर गे इंडियाचा विजेता ठरला होता. मग त्याने मिस्टर गे वर्ल्ड २०१४ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.