टीव्हीवरील लोकप्रिय हिंदी विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या निर्मात्यांबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. या शोमध्ये मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने शोचा निर्माता असित कुमार मोदीविरोधातील लैंगिक छळाचा खटला जिंकला आहे. या प्रकरणात जेनिफरचं थकबाकी असलेलं मानधन व नुकसानभरपाई म्हणून पाच लाख रुपये देण्याचे आदेश स्थानिक समितीने दिले आहेत. तिचं बाकी मानधन २५ -३० लाख रुपये असावं असं तिने सांगितलं. पण ४० दिवसांपूर्वी या खटल्याचा निकाल लागला असून अद्याप पैसे मिळाले नसल्याचं जेनिफरने म्हटलं आहे.

‘इंडिया टुडे’शी बोलताना जेनिफर म्हणाली, “हे खरंय की मी जिंकलेय, पण मी फार आनंदी नाही. कारण प्रकरणाचा निकाल लागून ४० दिवस उलटले आहेत मात्र मला माझे पैसे अद्याप मिळालेले नाही. माझी थकबाकी एक वर्षाहून अधिक काळापासून दिलेली नाही, खटला जिंकूनही मला अजून न्याय मिळालेला नाही.” यावेळी जेनिफरने सांगितलं की तिने तिच्या तक्रारीत मालिकेचे प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्या नावाचा उल्लेख केला आहे, पण त्यांना कोणतीही शिक्षा देण्यात आली नाही.

yeh hai mohabbatein fame krishna mukherjee shocking revelations about the Shubh Shagun producer of her show and reveals of being harassed
“निर्मात्याने मेकअप रुममध्ये केलं बंद अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग, म्हणाली…
Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India
“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम

लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

“मी त्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करायला गेले होते, पण सोहेल आणि जतीन यांचा या निकालात समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे मी आनंदी नाही. स्थानिक समितीने मला ही रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी असित मोदीला लैंगिक छळाच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे,” असं ती म्हणाली.

प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

या निकालानंतर मी असित मोदींविरोधात लैंगिक छळाचा खोटा खटला दाखल केला नव्हता हे सिद्ध झालं असं जेनिफर म्हणाली. “गेल्या वर्षभरात माझ्यावर झालेल्या मानसिक आघाताचं काय? गुन्हेगार निर्दोष असल्याचं भासवून मोकळे फिरत आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या या निकालामुळे मी खोटा खटला दाखल केला नव्हता, मी वूमन कार्ड खेळत नव्हते व मी प्रसिद्धीसाठी बोलले नव्हते हेच सिद्ध झालंय. मी जे खरं आहे तेच सांगितलं. पण मला योग्य न्याय मिळालाय, असं मला वाटत नाही,” असं मत जेनिफरने व्यक्त केलं.

१७ मिनिटांचा किसिंग सीन अन् ब्लॉकबस्टर सिनेमात काम, एकेकाळी ९०० रुपये महिना कमवायची आमिरची हिरोईन

यापूर्वी थकलेल्या मानधनासाठी तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनीही तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणात निकाल लोढा यांच्या बाजूने लागला होता. त्यानंतर संबंधित विभागाने असित मोदीला नुकसानभरपाईचे आदेश दिले होते.