scorecardresearch

Premium

अमिताभ बच्चन यांच्यासमोर हात जोडले, पाया पडला अन्…; ७ कोटींच्या प्रश्नाआधी भावुक झाला स्पर्धक, पाहा व्हिडीओ

‘कौन बनेगा करोडपती’च्या पंधराव्या पर्वाला मिळणार दुसरा करोडपती, व्हिडीओ व्हायरल

kaun banega crorepati season 15
'कौन बनेगा करोडपती'मध्ये स्पर्धक झाला भावुक, पाहा व्हिडीओ

‘कौन बनेगा करोडपती’चा पंधरावा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या २३ वर्षांपासून हा शो होस्ट करत आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाबचा २१ वर्षीय जसकरण सिंग पंधराव्या पर्वाचा पहिला करोडपती ठरला होता. आता लवकरच आणखी एक स्पर्धक करोडपती होणार आहे. करोडपतीच्या निर्मात्यांनी नुकताच कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये ७ कोटींच्या शेवटच्या प्रश्नाला एक स्पर्धक खूप भावुक झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.

हेही वाचा : “गेल्यावर्षी १०० कोटींचा प्रोजेक्ट सोडला, कारण…”, अभिनेता गोविंदाने केला खुलासा; म्हणाला, “स्वत:च्या कानाखाली मारून…”

karan johar announces koffee with karan season 8
“ट्रोलिंग, स्टारकिड्स अन्…”, ‘कॉफी विथ करण’च्या नव्या पर्वाला ‘या’ दिवशी होणार सुरूवात, पाहा टीझर…
marathi actor Sharad Ponkshe
महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित केलेल्या नदीचा व्हिडीओ शरद पोंक्षेंनी केला शेअर; म्हणाले, “जगातली…”
ganesh chaturthi 2023 tharla tar mag fame amit bhanushali
Ganesh Chaturthi 2023: ढोल ताशांच्या गजरात ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरच्या बाप्पाचं आगमन; पाहा व्हिडीओ
famous comedian sunil grover washing clothes video goes viral on social media instagram netizens reaction
सुनील ग्रोवरचा रस्त्याच्या कडेला कपडे धुतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्हीही एकदा पाहाच

सोनी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘कौन बनेगा करोडपती’चा नवा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन संबंधित स्पर्धकाला ७ कोटी रुपयांचा १६ वा प्रश्न विचारत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा प्रश्न विचारण्यापूर्वी स्पर्धक भावुक झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हा स्पर्धक अमिताभ बच्चन यांच्यासमोर हात जोडून, पाया पडून त्यानंतर त्यांना मिठी मारून रडत असल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : “गणपतीसमोर चपला घालू नकोस…”, ट्रोलरच्या कमेंटला उत्तर देत फराह खान म्हणाली…

“भावना अशाच निर्माण होत नाही, प्रत्येक भावनेमागे एक विशिष्ट कारण असतं…मी तुम्हाला जरुर सांगेन” असं बिग बी या प्रोमोमध्ये बोलताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी जसकरण सिंग या २१ वर्षाच्या मुलाने ७ कोटींच्या प्रश्नापर्यंतचा टप्पा गाठला होता. परंतु, उत्तराची खात्री नसल्याने त्याने खेळ सोडला. जसकरणने तब्बल १ कोटी जिंकत आपलं स्वप्न पूर्ण केलं. तो पंधराव्या पर्वाचा पहिला करोडपती ठरला होता. आता लवकरच या पर्वाला दुसरा करोडपती मिळणार आहे.

हेही वाचा : नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”

दरम्यान, अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. करोडपतीचा हा नवा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी या संबंधित स्पर्धकाने ७ कोटी जिंकले असावेत असा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. आता खरंच या स्पर्धकाने ७ कोटी जिंकलेत की नाही? हे आपल्याला येत्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kaun banega crorepati season 15 contestant attempting final 7 crore question fall emotional sva 00

First published on: 20-09-2023 at 15:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×