‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्हीवरील लोकप्रिय क्विझ शो आहे. सध्या त्याचे १५ वे पर्व सुरू आहे. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हा शो होस्ट करत आहेत. हा शो दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालला आहे. देशभरातील अनेक स्पर्धक या शोमध्ये आपलं नशीब आजमवतात आणि त्यापैकी काही जण विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन चांगली रक्कम घरी घेऊन जातात. पण सध्या या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन स्पर्धकाला मध्य प्रदेशबद्दल प्रश्न विचारताना दिसतात. मध्य प्रदेशमध्ये सध्या निवडणुका चालू आहेत, याचदरम्यान केबीसीमधील हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. अमिताभ स्पर्धकाला विचारतात, ‘२०१८ मधील कमलनाथ सरकारने किती शेतकऱ्यांची कर्ज माफी केली होती?’ यासाठी ते चार पर्यायही स्पर्धकाला देतात. त्यापैकी स्पर्धक २७ लाख रुपये असलेला पर्याय निवडतो. त्याचं हे उत्तर बरोबर असल्याचं अमिताभ सांगतात, असा हा व्हिडीओ आहे.

BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?

“मी शूटिंगचा भाग नव्हतो”, नाना पाटेकरांनी मारलेल्या चाहत्याने दिली संपूर्ण घटनेबाबत प्रतिक्रिया; म्हणाला, “त्यांनी मला…”

दरम्यान, आता चॅनलने हा व्हिडीओ शेअर करत तो बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. हा प्रश्न अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये कोणत्याही स्पर्धकाला विचारण्यात आला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं आहे. सोनी टीव्ही चॅनलने आपल्या अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ व एक स्टेटमेंट जारी करत या व्हिडीओचे सत्य उघड केले आहे. “कौन बनेगा करोडपतीचा हा बनावट व्हिडीओ लोकांची दिशाभूल करत आहे. तुम्हाला खरा एपिसोड बघायचा असेल तर आमच्या युट्यूब चॅनेलवर जा,” असं त्यांनी म्हटलं आहे.

“आमच्या कौन बनेगा करोडपती शोचा एक बनावट व्हिडीओ व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये होस्ट आणि स्पर्धकाच्या बनावट आवाजाचा वापर करून खोटा कंटेंट दाखवण्यात आला आहे. अशा चुकीच्या माहितीचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही या प्रकरणी सायबर सेलसह मिळून काम करत आहोत. दर्शकांना विनंती आहे की त्यांनी व्हेरिफाय न केलेला कोणताही कंटेंट शेअर करू नये”, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनच्या एका जाहिरातीचाही मध्य प्रदेश निवडणुकांसदर्भात असाच वापर करण्यात आला होता. कार्तिकने केलेली मूळ जाहिरात एका ओटीटी प्लॅटफॉर्मची होती, पण ती एडिट करून कमलनाथ यांच्या प्रचारासाठी वापरण्यात आली होती. यासंदर्भात मूळ व्हिडीओ शेअर करत कार्तिकने तो व्हायरल होणारा व्हिडीओ खोटा असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.