‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमामुळे अनेक कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. गौरव मोरे, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, ओंकार राऊत, रोहित माने, निखिल बने, वनिता खरात या सगळ्यांना हास्यजत्रेमुळे एक नवीन ओळख मिळाली. यांच्याबरोबर अभिनेता दत्तू मोरे सुद्धा घराघरांत लोकप्रिय झाला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. दत्तू सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असतो. नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्याने त्याच्या असंख्य चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

दत्तू मोरेने गेल्यावर्षी लग्नगाठ बांधत एका नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. नुकताच त्याने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्याने रोमँटिक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “गिफ्ट लवकरच…?” असं लिहिलं होतं. यावरून अभिनेत्याला नेमकं काय गिफ्ट मिळणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दत्तूने त्याला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला नेमकं काय गिफ्ट मिळालं याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : शाहरुख खानला रुग्णालयातून डिस्चार्ज; रातोरात पत्नी गौरीसह अहमदाबादहून गाठली मुंबई

दत्तू मोरेला त्याच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्वातीने नवीकोरी बाईक गिफ्ट केली आहे. याचा खास व्हिडीओ अभिनेत्याने शेअर केला आहे. “लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट…खूप खूप थँक्यू बायको” असं कॅप्शन देत दत्तूने त्याच्या नव्याकोऱ्या बाईकची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

हेही वाचा : Video : माधुरी दीक्षित झाली ‘बाहुबली’ चित्रपटातील अवंतिका; धकधक गर्लच्या मनमोहक अदा पाहून चाहते भारावले

दत्तू मोरेला पत्नीकडून मिळालं खास गिफ्ट, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : घरच्यांचा लग्नाला तीव्र विरोध पण…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने वाचा फिल्मी लव्हस्टोरी

अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर वनिता खरात, निखिल बने यांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय असंख्य नेटकऱ्यांनी सुद्धा दत्तूने शेअर केलेल्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, दत्तू आणि स्वातीने २३ मे २०२३ रोजी गुपचूप लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर या जोडप्याने लग्नाचं रिसेप्शन ठेवलं होतं. त्यांच्या लग्नाला हास्यजत्रेच्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तसेच दत्तूच्या लग्नाचे फोटो सुद्धा इन्स्टाग्रामवर सर्वत्र व्हायरल झाले होते.