आयपीएल २०२४ चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. आता लवकरच प्लेऑफ सामन्यांना सुरुवात होणार आहे. शनिवारी झालेल्या आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्जच्या सामन्यानंतर प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ निश्चित झाला आहे. चेन्नई सुपरकिंग्जवर २७ धावांनी विजय मिळवल्याने आरसीबीच्या संघाला अगदी शेवटच्या क्षणाला प्लेऑफचं तिकीट मिळालं आहे.

आयपीएलचा यंदाचा हंगाम आरसीबीसाठी सुरुवातीच्या काळात फारसा बरा नव्हता. या संघाला सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये सलग पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी निराशा आली होती. परंतु, टीमने अचानक काही बदल करत सलग ६ सामने जिंकले आणि आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन करत या शर्यतीत स्वत:चं स्थान टिकवून ठेवलं. सध्या RCB च्या संघावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. या विजयावर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Marathi Actress Aishwarya Narkar angry and answer to trolls
“जवानीमध्ये असे नखरे दाखवायला पाहिजे होतेस,” म्हणणाऱ्यावर ऐश्वर्या नारकर संतापल्या, म्हणाल्या, “भाऊ…”
maharashtrachi hasya jatra fame dattu more got special gift from his wife
“पाय पुरतात का गाडीवर?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेचं भन्नाट उत्तर; म्हणाला…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Maharashtrachi Hasyajatra Fame Prathamesh Shivalkar built farmhouse
शिवाली परबनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने बांधलं हक्काचं घर; फोटो शेअर करत म्हणाला, “स्वप्नातली वास्तू…”
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…

हेही वाचा : Video : RCB संघाने प्लेऑफ गाठल्यावर अनुष्का शर्मा झाली भावुक! विराट कोहलीला पाहून दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ओंकार राऊतने सुद्धा विराट कोहलीला उद्देशून एक खास पोस्ट लिहिली आहे. आरसीबी संघ प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता केवळ १ टक्का होती. यासंदर्भात अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट नेमकी काय आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : RCB ने प्लेऑफ गाठल्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची फक्त एका शब्दाची पोस्ट, म्हणाला…

ओंकार राऊतची पोस्ट चर्चेत

“क्रिकेट काय शिकवतं? विराट कोहली सांगतो एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त १ टक्का शक्यता असेल तर, अनेकदा ती १ टक्का शक्यता देखील पुरेशी असते” असं ओंकार राऊतने कोहलीला उद्देशून लिहिलं आहे.

हेही वाचा : “नवऱ्याबरोबर का फिरत नाहीस?”, चाहतीच्या प्रश्नावर अमृता खानविलकरचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, “हिमांशू आणि मला…”

onkar raut post
ओंकार राऊतने शेअर केली इन्स्टाग्राम स्टोरी

ओंकार राऊतप्रमाणे गौरव मोरेने सुद्धा विराट कोहलीचा उल्लेख “बाजीगर…” असा केला आहे. रुचिरा जाधव, मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील इन्स्टाग्राम पोस्ट शेअर आरसीबीच्या संघाचं कौतुक केलं. दरम्यान, बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि चेन्नई संघांमध्ये आयपीएलचा ६८ सामना खेळवण्यात आला. यादरम्यान विराट कोहलीच्या आरसीबी संघाने चेन्नईवर २७ धावांनी विजय नोंदवला आणि हा संघ प्लेऑफसाठी पात्र झाला. मॅच जिंकल्यावर विराटसह संपूर्ण RCB संघाने मैदानात एकच जल्लोष केला.