Premium

Video: “…एकदा येऊन तर बघा”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित मानेच्या बायकोने घेतला खास उखाणा; व्हिडीओ झाला व्हायरल

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सावत्याच्या बायकोचा खास उखाणा

Maharashtrachi Hasyajatra fame rohit mane wife take special ukhana video goes viral
'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सावत्याच्या बायकोचा खास उखाणा

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, ओंकार भोजने, नम्रता संभेराव, विश्वाखा सुभेदार, पॅडी कांबळे, वनिता खरात, रोहित माने अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ठिकठिकाण हा चित्रपट हाऊसफुल्ल झाला आहे. अशातच सोशल मीडियावर अभिनेता रोहित मानेच्या बायकोच्या उखाण्याच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री नम्रता संभेराव हिने तिच्या सोशल मीडियावर रोहित मानेच्या बायकोच्या उखाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. “आमच्या सावत्याच्या बायकोने प्रोमोशन दरम्यान घेतलाय भारी उखाणा…’एकदा येऊन तर बघा’ जवळच्या चित्रपटगृहात हाऊसफुल्ल प्रतिसाद” असं कॅप्शन लिहित नम्रताने उखाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – तेजश्री प्रधान ‘या’ दोन गोष्टींमुळे ओरडत असते राज हंचनाळेला, म्हणाली, “मी…”

या व्हिडीओत प्रसाद खांडेकर, रोहित माने, त्याची बायको, वनिता खरात आणि प्रेक्षक दिसत आहेत. यावेळी रोहितची बायको श्रद्धा उखाणा घेत म्हणते की, “महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत सावत्या म्हणतो लगा लगा लगा…आमचा चित्रपट सगळ्यांनी एकदा येऊन तर बघा” या उखाण्यानंतर सर्वजण ओरडताना दिसत आहेत.

हेही वाचा – “पोलीस, एसपी ते महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष”, अभिनेते मिलिंद गवळींची वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट

दरम्यान, ‘एकदा येऊन तर बघा’ ८ डिसेंबरला प्रक्षेकांच्या भेटीस आला आहे. प्रसाद खांडेकरने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, गाणी तर हिट झाली आहेत. आता चित्रपट सुपरहिट ठरतो का? हे येत्या काळातचं स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame rohit mane wife take special ukhana video goes viral pps

First published on: 10-12-2023 at 13:45 IST
Next Story
तेजश्री प्रधान ‘या’ दोन गोष्टींमुळे ओरडत असते राज हंचनाळेला, म्हणाली, “मी…”