Premium

तेजश्री प्रधान ‘या’ दोन गोष्टींमुळे ओरडत असते राज हंचनाळेला, म्हणाली, “मी…”

अभिनेत्री तेजश्री प्रधानने ओरडण्यामागचं सांगितलं कारण, म्हणाली, “…यासाठी मी आग्रही असते”

premachi goshta fame tejashri pradhan shout on raj hanchanale for this reason
अभिनेत्री तेजश्री प्रधानने ओरडण्यामागचं सांगितलं कारण, म्हणाली, "…यासाठी मी आग्रही असते"

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमुळे सध्या अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे चांगलेच चर्चेत आहेत. मालिकेत तेजश्रीने साकारलेली मुक्ता आणि राजने साकारलेला सागर प्रेक्षकांच्या अल्पावधीतच पसंतीस पडले आहेत. लवकरच मालिकेत मुक्ता-सागरचा लग्नसोहळा सुरू होणार आहे. उद्या मुक्ता-सागरचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यामुळे मालिकेत दोघांच्या प्रेमाची गोष्ट येत्या काळात पाहायला मिळणार आहे. अशातच मुक्ता म्हणजे तेजश्रीने मालिकेच्या सेटवर ती राज हंचनाळेला का ओरडते? यामागच्या कारणाचा खुलासा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता राज हंचनाळे एका एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना म्हणाला होता की, जशी ऑनस्क्रीन मुक्ता मला ओरडत असते, तशीच ऑफस्क्रीन तेजश्रीने देखील ओरडत असते. यावरच तेजश्री ‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना म्हणाली, “मी भाषेच्या बाबतीत खूप शिस्तबद्ध असते. आपला सहकलाकार जास्तीत जास्त स्क्रीनवर छान वाटावा यासाठी मी ओरडत असते. न आणि ण, फ आणि प, क आणि ख अशा पद्धतीच्या अक्षरांमध्ये कधीतरी कन्फूज होतं. ते नीट ऐकू आलं पाहिजे, यासाठी मी आग्रही असते. म्हणून मी त्याला परत बोल, हे चुकलंय, परत बोल अशी ओरडत असते.”

हेही वाचा- “पोलीस, एसपी ते महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष”, अभिनेते मिलिंद गवळींची वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट

“याशिवाय मस्ती मस्तीमध्ये राजला खूप उशीरा विनोद कळतात. राज हसायला लागल्यावर कळायला लागतं की, त्याला दोन तासांपूर्वीचा विनोद कळलाय आणि त्यावर तो आता हसतोय. त्यामुळे त्याला मी तू खूप स्लो आहेस का? अशी देखील ओरडत असते,” असं तेजश्रीने सांगितलं.

हेही वाचा – टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत चुरस; टॉप-१० मालिका जाणून घ्या…

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सागरची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी झाली आहे. आता हीच लाडकी जोडी लग्नबंधनात अडकणार आहे आणि त्यानंतर काय-काय घडतं? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Premachi goshta fame tejashri pradhan shout on raj hanchanale for this reason pps

First published on: 10-12-2023 at 12:21 IST
Next Story
‘ठिपक्यांची रांगोळी’फेम अभिनेत्रीच्या आईने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; फोटो शेअर करत म्हणाली, “या वयात हा निर्णय घ्यायला…”