अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या ‘झी मराठी वाहिनी’वरील मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील ऐश्वर्या यांनी साकारलेली अद्वैतची आई, रुपाली म्हात्रेची (विरोचक) भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतील पडली आहे. या भूमिकेमुळे ऐश्वर्या नारकरांचा वेगळा अवतार पाहायला मिळलंत आहे. मालिकेतील त्यांच्या अभिनयाचं नेहमी खूप कौतुक होतं असतं. अशातच ऐश्वर्या नारकरांनी मँगो कुल्फी झटपट कशी बनवायची? याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. फोटो, मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अनेकदा त्यांना व्हिडीओमुळे ट्रोल केलं जातं. पण या ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर सडेतोड उत्तर देतात. नुकताच ऐश्वर्या यांनी मँगो कुल्फी बनवतानाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांबरोबर रेसिपी पोस्ट केली आहे.

Divya Agarwal deleted wedding photos
प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवले लग्न अन् गुढीपाडव्याचे फोटो, तीन महिन्यांतच घेणार मराठमोळ्या पतीपासून घटस्फोट?
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
ranbir and alia bhatt daughter raha kapoor raha is animal lover
Video : अवघ्या दीड वर्षांच्या राहा कपूरचं प्राणीप्रेम! रणबीरच्या लेकीची ‘ती’ कृती कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल
aishwarya narkar dance on koli song
Video : ऐश्वर्या नारकरांचा मेकअप रुममध्ये कोळी गाण्यावर जबरदस्त डान्स; सोबतीला होत्या मालिकेतील ‘या’ अभिनेत्री
The women danced to the pink saree song wearing Nauvari
याला म्हणतात मराठमोळा डान्स! नऊवारी नेसून गुलाबी साडी गाण्यावर महिलांनी धरला ठेका… Viral Video पाहून युजर्स करतायत कौतुक
Amala Paul blessed with baby boy
Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ
hrishikesh shelar shared photos with real life wife
अधिपतीच्या खऱ्या आयुष्यातील मास्तरीण बाईंना पाहिलंत का? लग्नाला पूर्ण झाली ७ वर्षे, शेअर केला फॅमिली फोटो
Saregamapa Little Champs fame Rucha Ghangrekar sing tharala tar mag serial title song
Video: ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम ऋचा घांगरेकरने गायलं ‘ठरलं तर मग’ मालिकेचं शीर्षकगीत, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

हेही वाचा – शिवाली परबनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने बांधलं हक्काचं घर; फोटो शेअर करत म्हणाला, “स्वप्नातली वास्तू…”

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ऐश्वर्या नारकरांनी मँगो कुल्फीची रेसिपी दिली आहे. “साहित्य – दुध, कंडेन्स मिल्क, ड्रायफ्रुट्स आणि आंबा. कृती – आधी दूध उकळवा आणि त्यात कंडेन्स मिल्क घाला. थोडा वेळ उकळून झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर घाला. मग ते घट्ट होईपर्यंत उकळू द्या. त्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक आंबा घ्या आणि त्याचे तुकडे न करता बी काढा. मग आंब्यामध्ये थंड झालेलं मिश्रण टाका. ६ ते ७ तास रेफ्रिजरेट करा. त्यानंतर आंब्याची साल काढून घ्या आणि त्याचे तुकडे करा. तुमची मँगो कुल्फी झाली तयार…” अशा प्रकारे ऐश्वर्या नारकर यांनी झटपट मँगो कुल्फी कशी बनवायची सांगितली आहे.

हेही वाचा – Video: पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी रिक्रिएट केला अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा; हुबेहूब वेशभूषा, सेलिब्रिटींची नक्कल अन्…

हेही वाचा – “निवांत अर्धा तास गप्पा अन्…”, Cannes निमित्ताने छाया कदम यांची ए.आर. रेहमान यांच्याशी झाली खास भेट, फोटो शेअर करत म्हणाल्या…

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऐश्वर्या नारकरांच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मला पण पाहिजे”, “व्वा”, “आता सुगरण ऐश्वर्या”, “मस्त”, “मला पण हे खायचं आहे”, “हे खूप भारी आहे”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.