प्रसिद्ध पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक अभिनेत्री अनघा भगरे ‘रंग माझा वेगळा’ या ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचली. आपल्या दमदार अभिनयाने अनघाने प्रेक्षकांची मनं जिंकली. काही महिन्यांपूर्वी ती ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘पिरतीचा वनवा उरली पेटला’ मालिकेत झळकली होती. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीचा भाऊ म्हणजेच भगरे गुरुजींचा मुलगा अखिलेश भगरे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अनघाने नुकतेच लग्नाआधीच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात अखिलेश भगरेच्या लग्नाची सुपारी फुटली होती. याचा फोटो पोस्ट करत अनघाने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. अखिलेश आणि त्याची होणारी बायको वैष्णवीचा फोटो शेअर करत अनघाने लिहिलं होतं, “चला सुपारी फुटली एकदाची. अभिनंदन अखिलेश आणि वैष्णवी. तुम्हा दोघांना खूप सारं प्रेम.” आजपासून अखिलेशच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – Video: सागरने स्वतः मुक्ताला सांगितलं तिच्या आईच्या अपघातामागच्या खऱ्या आरोपीचं नाव, माधवी-पुरुला बसला धक्का

अनघाने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडीओमध्ये मुहूर्ताची तयारी करताना नातेवाईक दिसत आहेत. पोलपोट लाटणं, जातं, सुप, खलबत्ता, चुलं असं सर्व काही फुलांनी सजवलेलं दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये अनघा आपल्या नातेवाईकांबरोबर सांडगे घालताना पाहायला मिळत आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/05/Angha-Atul-Video-3.mp4

हेही वाचा – Video: ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील ‘सत्यानास’ गाण्यावर कार्तिक आर्यनबरोबर जबरदस्त नाचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ व्हायरल

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/05/Angha-Atul-Video-2-8.mp4

हेही वाचा – Video: मराठी अभिनेत्रीच्या आजीला ‘गुलाबी साडी’ गाण्याची पडली भुरळ; नटून-थटून केला भन्नाट डान्स

त्यानंतरच्या व्हिडीओमध्ये हळद कुटण्याचा कार्यक्रमात होताना दिसत आहे. अखिलेश कुटुंबातील महिलांबरोबर हळद कुटताना पाहायला मिळत आहे. यावेळी अनघा देखील दिसत आहे. याचाच अर्थ आता लवकरच अखिलेशला हळद लागणार असून तो वैष्णवीशी लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/05/Angha-Atul-1.mp4

हेही वाचा – Video: “एव्हरग्रीन लव्हबर्ड्स”, ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकरांचा रोमँटिक डान्सवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची पत्रिका चर्चेत, चार दिवस विदेशात क्रूझवर होणार धमाल; अंबानी-मर्चंट कुटुंबातील सदस्य झाले रवाना

दरम्यान, गेल्या वर्षी अनघाने अखिलेशच्या सााथीने पुण्यात स्वतःचं हॉटेल सुरू केलं. ‘वदनी कवळ’ असं या हॉटेलचं नाव असून भावा-बहिणीनं सुरू केलेल्या या हॉटेलला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठीतील बरेच कलाकार अनेकदा ‘वदनी कवळ’ हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतना दिसत असतात.