‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता अजूनही आपल्या आईच्या अपघातामागच्या आरोपीला शोधताना दिसत आहे. अशातच हर्षवर्धन व सावनीची कुरघोडी सुरू आहे. मुक्ता-सागरला दूर करण्यासाठी दोघं वेळोवेळी प्रयत्न करताना दिसत आहे. पण आता अखेर सागरचं स्वतः मुक्ताला तिच्या आईच्या अपघातामागच्या खऱ्या आरोपीचं नाव सांगणार आहे.

अलीकडेच हर्षवर्धनने मुक्ताला सावनीविरोधात भडकवण्यासाठी एक डाव रचतो. तो स्वतः मुक्ताला जाऊन सांगतो की, तुझ्या आईचा अपघात सावनीने केलाय. यामुळे मुक्ताला आश्चर्याचा धक्का बसतो. दुसऱ्या बाजूला सावनी सागरला दारू प्यायला देऊन एक कारस्थान रचते. सागरवरच्या मुक्ताच्या विश्वासाला तडका जाण्यासाठी त्याला दारू प्यायला देऊन त्याचा गैरफायदा घेत असते. पण मुक्ताला सावनीचं घाणेरडं कारस्थान समजतं. त्यामुळे मुक्ता सावनीच्या चांगलीच कानशिलात लगावते आणि तुला मी मुर्ख वाटले का?, असं बोलून सागरला घेऊन जाते. त्यानंतर सागर दारूच्या नशेत मुक्ताला अपघातामागचं सत्य सांगतो. याचा व्हिडीओ ‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची पत्रिका चर्चेत, चार दिवस विदेशात क्रूझवर होणार धमाल; अंबानी-मर्चंट कुटुंबातील सदस्य झाले रवाना

या व्हिडीओत, मुक्ता सागरला विचारते, “हर्षवर्धनने सांगिलेलं ते खरं आहे? नाही ना? खोटं आहे ना ते?” त्यावर मान हलवून सागर खोटं असल्याचं सांगतो आणि म्हणतो, “खरंतर अपघात आदित्यकडून झालाय.” हे ऐकून मुक्ताच्या पाया खालची जमीनच सरकते. मुक्ता म्हणते, “आदित्यच्या हातून जी चूक घडली आहे, ती गुन्हा म्हणण्या इतकी मोठी आहे हे कळतंय ना तुम्हाला?”

त्यानंतर सागर मुक्ताच्या घरच्यांना खऱ्या आरोपीविषयी सांगायला जातो. तेव्हा सागर मुक्ताच्या आईला म्हणतो, “तुमचा जो अपघात झाला तो दुर्दैवी होता. पण ज्याने केलाय तो आपला असणं हे त्याहून जास्त वाईट आहे.” मग आदित्य येतो. हे पाहून माधवी आणि पुरुला धक्काचा बसतो. आता यापुढे काय होणार? आदित्यला अपघाताची शिक्षा मिळणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील ‘सत्यानास’ गाण्यावर कार्तिक आर्यनबरोबर जबरदस्त नाचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, गेल्या आठवड्याच्या आलेल्या टीआरपी रिपोर्टमध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी घसरल्याचं पाहायला मिळत आहे. तेजश्री प्रधान व राज हंचनाळेची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका टीआरपीच्या यादी दुसऱ्या नंबरवर असायची, पण गेल्या आठवड्यातील टीआरपीच्या यादीत चौथ्या नंबरवर आली आहे.