सोशल मीडियावर अनेक मराठी गाणी ट्रेंड होतं असतात. त्यापैकी एक संजू राठोड व प्राजक्ता घाग यांच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याची क्रेझ कायम आहे. सोशल मीडियावर अजूनही गाणं ट्रेंड होतं असून अनेकजण यावर डान्स व्हिडीओ करत आहेत. अशा या लोकप्रिय गाण्याची भुरळ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आजीला पडली आहे. त्यामुळे नटून-थटून अभिनेत्रीच्या आजीने भन्नाट डान्स ‘गुलाबी साडी’ गाण्यावर केला आहे. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची झाली फसवणूक, संतप्त विदिशाने पोस्ट करत कलाकारांना केली ‘ही’ विनंती

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खडतर प्रवास करून मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलं होतं. पण आता लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. २०१८मधील ‘स्टार प्रवाह’च्या ‘छत्रीवाली’ ही तिची पहिली मालिका. या मालिकेत अभिनेत्रीने प्रमुख भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिकली. अल्पावधीतची ही अभिनेत्री नावारुपाला आली. त्यानंतर ती ‘मिसेस देशमुख’ या चित्रपटात ती झळकली. गेल्या वर्षी तिची लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता ही प्रसिद्ध अभिनेत्री कोण असेल? हे लक्षात आलंच असेल. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील सुमी म्हणजेच अभिनेत्री नम्रता प्रधान हिची ही आजी आहे.

हेही वाचा – ऑनलाइन ओळख, कच्चे तळलेले बोंबील ते लग्नाची मागणी; चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने सांगितली प्रेमकहाणी

“जेव्हा तुमची आजी गुलाबी साडीवर व्हिडीओ करण्याची फर्माईश करते,” असं कॅप्शन लिहितं नम्रताने आजीचा छान व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, नम्रताची आजी गुलाबी साडी नेसून मेकअप करून मस्त नटून-थटून तयार झालेली पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आजी ‘गुलाबी साडी’ गाण्याची हूक स्टेप करताना दिसत आहेत. नम्रताच्या आजीच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून सुप्रिया पाठारेंसह बऱ्याच कलाकारांनी लाइक केलं आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर चिमुकल्या लेकीसह निघाली परदेशवारीला, पोस्ट करत म्हणाली, “ताशीच्या…”

हेही वाचा – Video: आई-वडिलांच्या लग्नाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्ताने स्वप्नील जोशीची खास पोस्ट; जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाला…

अभिनेत्री नम्रता प्रधानच्या आजीचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. “एक नंबर आजी”, “मस्त”, “आजी लय भारी”, “किती सुंदर”, “आजी खूप गोड आहेत”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.