कबीर खान दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कार्तिक आर्यनचे चाहते त्याच्या या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर्स प्रदर्शित झाले. त्यानंतर ‘सत्यानास’ नावाचं चित्रपटातील पहिलं-वहिलं गाणं प्रदर्शित झालं असून ते सध्या ट्रेंड करत आहे. याचं गाण्यावर कार्तिक आर्यनबरोबर धकधक गर्ल माधुरी दीक्षित जबरदस्त नाचताना पाहायला मिळाली.

‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाच्या निमित्ताने कार्तिक आर्यनने नुकतीच ‘कलर्स टीव्ही’वरील ‘डान्स दिवाणे ३’ कार्यक्रमाच्या महाअंतिम फेरीला हजेरी लावली. यावेळी कार्तिक माधुरी दीक्षितसह थिरकला.

हेही वाचा – Video: “एव्हरग्रीन लव्हबर्ड्स”, ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकरांचा रोमँटिक डान्सवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. “‘सत्यानास’साठी मला माझी प्रमुख महिला मिळाली. दिग्गज माधुरी दीक्षित यांच्याबरोबर नाचणं हे स्वप्नाप्रमाणे होतं,” असं कॅप्शन लिहित कार्तिकने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्यासह माधुरी दीक्षित ‘सत्यानास’ गाण्यावर जबरदस्त नाचताना पाहायला मिळत आहे. अगदी कार्तिकच्या एनर्जी प्रमाणे माधुरी नाचताना दिसत आहे. त्यामुळेच व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

हेही वाचा – Video: मराठी अभिनेत्रीच्या आजीला ‘गुलाबी साडी’ गाण्याची पडली भुरळ; नटून-थटून केला भन्नाट डान्स

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची झाली फसवणूक, संतप्त विदिशाने पोस्ट करत कलाकारांना केली ‘ही’ विनंती

कबीर खान निर्मित, दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. कबीर खान यांच्याबरोबर साजिद नाडियाडवालाने या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाची कथा मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. सुवर्णपदक विजेते पेटकर यांनी १९७० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्वल केलं होतं.

हेही वाचा – Video: कुशल बद्रिकेनंतर ‘चला हवा येऊ द्या’मधील लोकप्रिय विनोदवीराची ‘मॅडनेस मचाएंगे’ हिंदी कार्यक्रमात एन्ट्री, व्हिडीओ आला समोर

दरम्यान, कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘चंदू चॅम्पियन’ व्यतिरिक्त त्याच्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाची देखील चाहते वाटत पाहत आहेत. या चित्रपटात कार्तिकबरोबर अभिनेत्री विद्या बालन, तृप्ती डिमरी, तब्बू आणि माधुरी दीक्षित झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजेच ‘भूल भुलैया ३’ माधुरी भुताची भूमिका करणार असल्याचं म्हटलं जात आहे.