मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी जुलैमध्ये राधिका मर्चंटशी लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी प्री-वेडिंग सोहळे जोरदार सुरू आहे. मार्च महिन्यात तीन दिवसांचा अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्ये पार पडला होता. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. मोठ्या थाटामाटात हा प्री-वेडिंगचा सोहळा पार पडला होता. आता पुन्हा एकदा अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा रंगणार आहे. पण भारतात नाही तर विदेशात प्री-वेडिंग सोहळा होणार आहे. या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याची पत्रिका नुकतीच समोर आली असून अंबानी व मर्चंट कुटुंबातील सदस्य सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर होणार आहे. २९ मे ते १ जूनपर्यंत हा प्री-वेडिंग सोहळा असून इटली ते फ्रान्स असा प्रवास असणार आहे. प्री-वेडिंग सोहळ्याच्या पत्रिकेमध्ये समारंभ, त्याची वेळ आणि समारंभसाठीचा ड्रेस कोड सांगितला आहे. त्यानुसार अनंत-राधिकाचा चार दिवसांचा प्री-वेडिंग सोहळा रंगणार आहे. त्यामुळे आता अंबानी, मर्चंट कुटुंबातील सदस्यांसह विविध क्षेत्रातील मंडळी प्री-वेडिंग सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत.

हेही वाचा – Video: ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील ‘सत्यानास’ गाण्यावर कार्तिक आर्यनबरोबर जबरदस्त नाचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी दुसऱ्या प्री-वेडिंगमधील पाहुण्यांची यादी समोर आली होती. त्या यादीत अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची नावं सामिल होती. ८०० पाहुण्यांव्यतिरिक्त ६०० कर्मचारी देखभालीसाठी क्रूझवर उपस्थित असणार आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर प्री-वेडिंगसाठी रवाना झालेल्या पाहुण्यांचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. अनंत अंबानीचे काका अनिल अंबानी प्री-वेडिंगसाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय लवकरच अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट देखील आपल्या वडिलांसह (वीरेन मर्चंट) कलिना एअरपोर्टवरून प्री-वेडिंगसाठी निघाल्याचं दिसत आहे.

हेही वाचा – Video: “एव्हरग्रीन लव्हबर्ड्स”, ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकरांचा रोमँटिक डान्सवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये काय-काय झालं होतं?

अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. या सोहळ्याला १२०० पाहुण्यांनी उपस्थितीत लावली होती.