अभिनय क्षेत्रापासून दूर असूनही अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्या आजही चर्चेत आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री सई लोकूर. मोजक्या चित्रपटात झळकली असली तरी तिने आपल्या अभिनयाचा ठसा मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत उमटवला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली सई सध्या आईपण आनंदात जगताना दिसत आहे. नुकतीच ती आपल्या चिमुकल्या लेकीसह परदेशवारीला निघाली आहे. याचे फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री सई लोकूरने गेल्या वर्षी १७ डिसेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर काही दिवसांनी मुलीचं बारस केलं. पण लेकीचं नाव सईने जाहीर केलं नव्हतं. १७ जानेवारी २०२४ अभिनेत्री मुलीचं नाव जाहीर करत तिने त्या नावामागचा अर्थ देखील सांगितला. सईच्या मुलीचं नाव ताशी असं आहे. ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभ असा होता. आता ताशीला पाच महिने पूर्ण झाले आहेत. अशात अभिनेत्री ताशीला घेऊन परदेशवारीला निघाली आहे.

हेही वाचा – Video: आई-वडिलांच्या लग्नाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्ताने स्वप्नील जोशीची खास पोस्ट; जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाला…

एक सुंदर असा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. या फोटोमध्ये सई, तिचा नवरा आणि चिमुकल्या ताशीचा पासपोर्टवर हात पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत सईने लिहिलं आहे, “…आणि अखेर ताशीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय हॉलीडेची वेळ आली. तिच्या मम्मीला प्रवास करायला खूप आवडतो आणि म्हणूनच मला माझ्या मुलीमध्येही हा प्रवासाचा गुण रुजवायचा आहे. आमचा प्रवास सुखकर होवो. आम्ही कुठे चाललो आहोत, याचा अंदाज लावू शकता.” या पोस्टसह सईने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर व्हिडीओ आणि फोटो देखील शेअर केले आहेत.

हेही वाचा – चिन्मय मांडलेकरच्या पत्नीला ‘अशी’ जडली मल्याळमची आवड, केसाच्या तेलापासून ते जेवणही बनतं केरळ पद्धतीत

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/05/Sai-Lokur-9.mp4

हेही वाचा – ऑनलाइन ओळख, कच्चे तळलेले बोंबील ते लग्नाची मागणी; चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने सांगितली प्रेमकहाणी

दरम्यान, सईच्या मुलीच्या नावाचं सिक्कीमशी खास कनेक्शन आहे. सई तिच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्याबरोबर सिक्कीमला गेली होती. तिकडे फिरताना तिला ताशी View Point (व्ह्यू पॉइंट) दिसला. तेव्हाच सईने ठरवलं की, जर आपल्याला मुलगी झाली तर तिचं नाव ताशी ठेवायचं. म्हणून तिने मुलीचं नाव ताशी ठेवलं आहे.