मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्यांपैकी एक म्हणजे चिन्मय मांडलेकर. चिन्मयने आपल्या उत्तम अभिनयाबरोबरच, लेखणीने, दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं आणि कायमचं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नव्हे तर तो निर्माता देखील आहे. असे सर्वगुण संपन्न असणाऱ्या चिन्मयची प्रेमकहाणी कधी तुम्ही वाचली आहेत का? नुकत्याचं एका मुलाखतीमध्ये चिन्मयची पत्नी नेहा जोशी-मांडेलकरने दोघांची ओळख, पहिली भेट याचा किस्सा सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आपली सोसल वाहिनी’ या युट्यूब चॅनलवरील ‘बिहाइंड दी सक्सेस’ या कार्यक्रमात चिन्मयची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर सहभागी झाली होती. यावेळी तिला चिन्मयबरोबर ओळख कशी झाली? याविषयी विचारण्यात आलं. तेव्हा नेहा जोशी-मांडलेकर म्हणाली, “चिन्मयची आणि माझी ओळख खूप फिल्मी पद्धतीत ऑनलाइन झाली. आम्ही ऑर्कुटवर भेटलो. तेव्हा मी आणि माझे मित्र-मैत्रीणी एका डॉक्युमेंट्रीवर काम करत होतो. त्याचं स्क्रिप्ट मी लिहिलं होतं. पण ते मी इंग्रजीत लिहिलं होतं. त्यानंतर आम्ही ते स्क्रिप्ट मराठीत लिहिण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मला भाषांतर करणं जमणार नव्हतं. तसंच माझे मित्र-मैत्रीण महाराष्ट्रीयन नव्हते. तर माझी एक मैत्रीण होती, तिने मला सांगितलं, तू चिन्मयला का नाही संपर्क करत? मी म्हटलं, कशाला उगाच वगैरे. त्यावेळेस चिन्मय लोकप्रिय होता. माझ्या कुटुंबातील सदस्य चिन्मयचे मोठे चाहते आहेत. कारण तेव्हा ‘असंभव’ मालिका सुरू होती. त्यामुळे माझी मैत्रीण म्हणाली, “मेल तर करून बघ.”

हेही वाचा – Video: रेड कार्पेटवर डान्स, स्टँडिंग ओव्हेशन अन्…; छाया कदम यांचा चित्रपट पाहून Cannes मध्ये टाळ्यांचा कडकडाट, पाहा अभिमानास्पद क्षण

“मग मी मेल केला. त्याने स्क्रिप्ट वाचलं. मी १५ ते २० दिवसांनी फोन केला आणि म्हटलं, “तुम्हाला स्क्रिप्ट कसं वाटलं?” तर तो म्हणाला, “तुम्ही काय असं नवीन सांगत नाहीये. जे लोकांना माहिती नाहीये.” मी म्हटलं, हा कोण उद्धट माणूस आहे. आपल्याशी असं का बोलतो? मग अशी ती ऑनलाइन मैत्री वाढली. आम्ही एक महिना फक्त एकमेकांशी चॅटवरती बोलत होतो. आम्ही भेटलो देखील नाही. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा ती पहिली भेट आणि दुसऱ्या भेटीत चिन्मयने मला लग्नासाठी विचारलं. त्यानंतर आम्ही दोन वर्षांनी लग्न केलं,” असं नेहा म्हणाली.

हेही वाचा – “अल्लाह, बस मौत…”, ‘बिग बॉस १६’ विजेता रॅपर MC Stan ची खळबळजनक पोस्ट व्हायरल

पुढे नेहाने कच्चे तळलेल्या बोंबीलचा किस्सा सांगितला. ती म्हणाली की, पहिली भेट झाल्यानंतर मला पुन्हा चिन्मयचा फोन आला आणि म्हणाला, “मला परत भेटशील का?” मी म्हटलं, “ओके”. मी त्याला घरी जेवायला बोलावलं. मी खूप चांगले मासे करते. पण त्यादिवशी बोंबील कच्चे राहिले, व्यवस्थित तळले गेले नाहीत. म्हणजे ते अगदीच कच्चे नव्हते. पण त्याने ते गुपचूप खाल्ले आणि मी त्याला पवईला सोडायला गेले होते. तेव्हा त्याने अर्धे कच्चे राहिलेले बोंबील खाऊनही विचारलं की, लग्न करशील माझ्याशी. मी म्हटलं ओके.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinmay mandlekar and neha joshi mandlekar love story pps
Show comments