आजकाल कलाकारांना ट्रोल करणं खूपच सोप झालं आहे. सोशल मीडियावर कलाकारांनी कोणतीही पोस्ट शेअर केली, मग ती कितीही चांगली असली तरी त्याला ट्रोल केलं जात. पण अशा ट्रोलर्सना काही कलाकार सडेतोड उत्तर देतात. काही दिवसांपूर्वीच ट्रोर्लिंगमुळे अभिनेता चिन्मय मांडलेकरने मोठा निर्णय घेतला. मुलाच्या जहांगीर नावामुळे चिन्मयला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. याला संतापून चिन्मयने यापुढे कधीची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही, असं जाहीर केलं. एवढं होऊन देखील त्याला ट्रोलिंग करणं थांबलंच नाही. असं काहीस गायिका जुईली जोगळेकरबरोबर घडताना दिसत आहे.

‘सारेगमप’मधून घराघरात पोहोचलेली आणि आपल्या सुमधूर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी गायिका जुईली जोगळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे गाण्याचे व्हिडीओ नेहमी शेअर करत असते. गेल्या महिन्यात तिने गुढीपाडव्याच्या निमित्ताने पती रोहित राऊतबरोबर सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. पण तिचा फोटो पाहून कोणी तिला म्हातारी म्हटलं तर कोणी तिला दातावरून हिणवलं. या सगळ्यांना जुईली सडेतोड उत्तर देताना दिसली. आता पुन्हा जुईलीला तिच्या दातावरून हिणवलं आहे.

हेही वाचा- “कोल्हापूरची माणसं म्हणजे…” अक्षय केळकरची ‘ती’ पोस्ट चर्चत, ‘अबीर गुलाल’ मालिकेच्या सेटवरील सांगितला अनुभव

नुकताच जुईलीने संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ सीरिजमधील ‘एक बार देख लीजिए’ हे लोकप्रिय गाणं तिच्या गोड आवाजात सादर केलं. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून अनेक जणांनी जुईलीच्या आवाजाचं कौतुक केलं. पण एका नेटकऱ्याने तिच्या व्हिडीओवर खटकणारी प्रतिक्रिया दिली.

त्या नेटकऱ्याने “दाताडी” अशी प्रतिक्रिया जुईलीच्या व्हिडीओवर दिली. या नेटकऱ्याला जुईलीने चांगलंच सुनावलं. गायिका म्हणाली, “कसं जमतं स्वतःचं थोबाड लपवून दुसऱ्यांना बोलायला? कमाल आहे तुमची.”

हेही वाचा – कौलारू घर, अंगण अन्…; ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याच्या कोकणातील सुंदर घराच्या व्हिडीओने सगळ्यांचं वेधलं लक्ष

दरम्यान, जुईली व रोहित ही मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. जुईली व रोहितच्या लग्नाला दुसरं वर्ष सुरू झालं असून २०२२मध्ये दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा, लग्न झालं होतं. २३ जानेवारी २०२२ रोजी दोघं लग्नबंधनात अडकले होते. पुण्यातील ढेपे वाड्यात जुईली व रोहितचा धुमधडाक्यात लग्न झालं होतं. या लग्नाला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती.