Premium

बायोपिकच्या घोषणेनंतर ड्रामा क्वीन राखी सावंतचे नवीन विधान; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे नाव घेत म्हणाली, “माझा चित्रपट…”

राखीने नुकतंच स्वतःच्या बायोपिकची घोषणा केली होती. आता चित्रपटाच्या दिग्दर्शनाबाबतही राखीने नवीन विधान केलं आहे

rakhi sawant
राखी सावतं

बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या खासगी आयुष्यातल्या प्रकरणामुळे अधिक चर्चेत आली आहे. नुकतच तिनं स्वतःच्या बायोपिकची घोषणा केली. एवढचं नाही तर ‘कांतारा’ चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी तो चित्रपट दिग्दर्शित करावा अशी इच्छाही तिने बोलून दाखवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “आयुष्याची काही वर्ष…” लतादीदींसाठी अभिजीत केळकरनं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला…

दरम्यान काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत राखीने आपल्या बायोपिकची घोषणा केली होती. रात्री म्हणालेली की, “माझा बायोपिक होत आहे. गेल्या २० वर्षात राखी सावंतने जेवढं हसवलं आहे, तेवढीच ती रडली आहे. शिवाय तितक्यात वेदना देखील तिनं सहन केल्या आहेत. एका झोपडपट्टीतून एक मुलगी कोणताही गॉडफादर नसताना, चांगलं शिक्षण नसताना, फोन किंवा चांगले कपडे नसताना बॉलीवूडपर्यंत पोहोचली. हा सर्व प्रवास दाखवण्यात येणार आहे.”

पुढे राखी म्हणाली की, “या बायोपिकचे किती सीझन असतील? कोण दिग्दर्शक असेल? कोण संगीतकार असेल? कोण कलाकार असतील? हे काही माहित नाही. आता आम्ही दोन जणांना विचारणा केली आहे. आलिया भट्ट आणि विद्या बालन यांना विचारलं आहे.”

हेही वाचा- झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच होणार बंद? ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता

राखीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली होती. एका यूजरने लिहिले, “आलिया भट्ट विचार करत असेल की हे कसे होऊ शकते” तर दुसऱ्याने लिहिले, “अरे आलिया भट्ट चांगला विनोद आहे. आणखी एकाने लिहिले, “डॉली बिंद्रा किंवा बाबिका ही सर्वोत्तम निवड असेल.”

हेही वाचा- Video : “स्वप्न खरी होतात…”, ‘वहिनीसाहेब’ धनश्री काडगावकरने ठाण्यात खरेदी केली दोन घरं, व्हिडीओत दाखवली झलक

राखी सावंतने आदिल दुर्राणीवर तिचा शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. तसेच लग्नादरम्यान आदिलचे अनेक विवाहबाह्य संबंध असल्याचे राखी म्हणाली. यानंतर आदिलला मुंबई पोलिसांनी यावर्षी ७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. पोलीस कोठडीतून सुटल्यानंतर आदिलने राखीने आपल्या जीवे मारण्याचा कट रचला असल्याचा दावाही केला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant wants kantara fame rishab shetty direct her biopic dpj

First published on: 28-09-2023 at 16:43 IST
Next Story
Video: डोंगर, नदी अन्…; निसर्गाच्या सानिध्यात अविनाश नारकरांनी गायलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाणं, नेटकरी म्हणाले…