सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच शुभंकर एकबोटे-अमृता बने, चेतन वेडनरे-ऋजुता धारप यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. आता लवकरच आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर नुकतेच तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली साळुंखेचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. अभिनेत्री ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली मराठी मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करत तिने लोकेशनमध्ये धुळे शहराचं नाव नमूद केलं आहे. यावरून अभिनेत्रीचा साखरपुडा धुळ्यात पार पडल्याचं स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : लग्नानंतर ऑस्ट्रेलियात गेलेली पूजा सावंत दीड महिन्यांनी मुंबईत परतली? ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

अभिनेत्री सोनाली साळुंखेने आजवर ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’, ‘रंग माझा वेगळा’, ‘गाथा नवनाथांची’, ‘विघ्नहर्ता गणेशा’ अशा विविध मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने रंगभूमीवर देखील काम केलेलं आहे. आता आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करत सोनालीने साखरपुडा उरकला आहे.

हेही वाचा : Video : अजरामर गीतरामायण ते बाबुजींचा खडतर प्रवास! ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात आहेत एकूण २७ गाणी

दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.