Premium

“तेजश्री प्रधान खूप…” लोकप्रिय गायिकेने केला अभिनेत्रीच्या स्वभावाबद्दल खुलासा, म्हणाली…

खऱ्या आयुष्यात तेजश्रीचा स्वभाव कसा आहे हे एका लोकप्रिय गायिकेने आता सांगितले आहे.

tejashri pradhan (2)

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. तिला भेटण्यासाठी तिचे चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. तिचा स्वभाव कसा आहे हे देखील चाहत्यांना जाणून घ्यायचं असतं. तर आता एका लोकप्रिय गायिकेने याचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेजश्रीने आतापर्यंत ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या भूमिका खूप सोज्वळ पण खंबीर अशा होत्या. खऱ्या आयुष्यातही तेजश्री तशीच आहे का, असा प्रश्न अनेकदा तिच्या चाहत्यांना पडतो. तर खऱ्या आयुष्यात तेजश्रीचा स्वभाव कसा आहे हे एका लोकप्रिय गायिकेने आता सांगितले आहे.

आणखी वाचा : दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या तेजश्री प्रधानचं शिक्षण किती ते माहीत आहे का? घ्या जाणून…

गायिका कीर्ती किल्लेदार हिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेतलं. तर यामध्ये एका चाहत्याने “तुझ्यात आणि तेजश्री प्रधानमध्ये कसं बॉण्डिंग आहे?” असा प्रश्न तिला विचारला. त्यावर कीर्तीने तेजश्रीबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “तेजश्री ही मला भेटलेली आत्तापर्यंत खूप गोड आणि टॅलेंटेड मुलगी आहे. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी मला एका गाण्यासाठी तिला आवाज देण्याची संधी मिळाली होती आणि तेव्हापासून आमची मैत्री घट्ट झाली.”

हेही वाचा : “मी कोण आहे हे माहित नसताना त्यांनी…”, तेजश्री प्रधानने सांगितला तिला अमरावतीला आलेला अनुभव

तर कीर्तीची ही स्टोरी तेजश्रीनेही रिपोस्ट केली. आता सोशल मीडियावरून त्या दोघींच्या बॉण्डिंगचं चाहते कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Singer kirti killedar revealed what is tejashri pradhan real life nature know abut it rnv

First published on: 12-09-2023 at 14:17 IST
Next Story
 ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला आवडतं ‘या’ पद्धतीचं जेवण; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली