‘बनू मैं तेरी दुल्हन’, ‘ये है मोहब्बतें’ अशा लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी घराघरांत पोहोचली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हिंदी टेलिव्हिजन विश्वात दिव्यांकाने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या सगळ्या चाहत्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण पसरलं आहे. यामागचं कारण म्हणजे, दिव्यांकाचा अपघात झाल्याची बातमी नुकतीच समोर आली. गुरुवारी ( १८ एप्रिल) ही घटना घडल्याची माहिती तिचा पती विवेक दहियाने पोस्ट शेअर करत दिली आहे.

अभिनेत्रीच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांकाच्या हातातील दोन हाडे मोडली आहेत. सध्या तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दिव्यांकावर उपचार करण्यात येणार आहे.

हेही वाचा : लाडक्या मैत्रिणीचा चित्रपट पाहून अमृता खानविलकर झाली भावुक! सोनाली खरे अन् सनायासाठी लिहिली खास पोस्ट

पत्नीचा अपघात झाल्याची माहिती मिळताच विवेकने सगळी कामं पुढे ढकलून ताबडतोब दिव्यांकाशी संपर्क साधला व रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाला. त्याने इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन सुद्धा मध्येच बंद केलं. पुढे, विवेकने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत दिव्यांकाच्या प्रकृतीचे अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर केले. तिला लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी अभिनेत्रीचे चाहते प्रार्थना करत आहेत. सध्या अभिनेत्री संपूर्णपणे डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

विवेक त्याच्या पोस्टमध्ये लिहिते, “काही तासांआधीच दिव्यांकाचा अपघात झाला हे सांगताना मला अतिशय दु:ख होत आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. उंचावरून पडल्यामुळे हा अपघात झाला आहे. ती बरी झाल्यावर मी पुन्हा लाइव्ह सेशल करेन. तुमचं प्रेम आणि साथ कायम ठेवा खूप खूप आभार”

हेही वाचा : Filmfare Marathi : यंदा ‘या’ दोन चित्रपटांनी मारली बाजी! सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री ठरले…; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

दिव्यांका त्रिपाठीची स्टोरी

दरम्यान, ८ जुलै २०१६ मध्ये दिव्यांका आणि विवेकने लग्नगाठ बांधली. ही जोडी प्रेक्षकांमध्ये कायमच चर्चेत असते. ‘ये है मोहब्बतें’ शोच्या सेटवर दिव्यांकाची भेट अभिनेता विवेक दहियाशी झाली आणि हळूहळू दोघेही प्रेमात पडले. पुढे २०१६ मध्ये लग्न करत दोघांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली.