‘पुढचं पाऊल’, ‘ठरलं तर मग’ अशा मराठी मालिकांमधून अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत पोहोचली. सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारतेय. या मालिकेतील साताऱ्यातली सायली प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. जुई तिच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी असो वा सेटवरील धमाल; ती आपल्या चाहत्यांबरोबर स्वत:चे अपडेटेड लाईफ शेअर करीत असते.

अनेकदा ती ‘ठरलं तर मग’च्या सेटवर डान्स व्हिडीओ, रील्स, शूटिंगचे व्हिडीओज, तसेच मेकअप रूममधली धमाल शेअर करीत असते. जुईनं तिच्या सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता; ज्यात जुईची मेकअप आर्टिस्ट तिचे टॅटूज मेकअपने लपवताना दिसतेय.

हेही वाचा… ऐश्वर्या नारकर यांचा साडीतला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; चाहते म्हणाले, “अदा, तुमच्यावर सारे फिदा…”

या मालिकेतील सायली या व्यक्तिरेखेसाठी जुईला हे टॅटू लपवावे लागतात. ‘दररोज टॅटू लपवण्याचे किस्से’, अशी कॅप्शन जुईने या व्हिडीओला दिली होती. जुईच्या पाठीवर मोरपीस असलेला टॅटू आहे; तर हातावरसुद्धा दोन टॅटू आहेत. हे तीनही टॅटू मेकअपच्या साह्याने लपवले जातात.

जाणून घेऊयात जुईच्या टॅटूंबद्दल

जुईच्या हातावर बुलेटप्रूफ नावाचा एक टॅटू आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत तिने या टॅटूचा अर्थ प्रेक्षकांना सांगितला आहे. “आय अॅम बुलेटप्रूफ, नथिंग टू लूज या गाण्यावरून मी हा टॅटू केलेला आहे. प्रत्येक टॅटूचं तुमच्या आयुष्यात महत्त्व असलं पाहिजे. तर, या टॅटूचं माझ्या आयुष्यातदेखील एक महत्त्व आहे. ते गाणं एका स्त्रीच्या आयुष्यावर आहे. एक स्त्री कशी बुलेटप्रूफ असते. कोणीही तिला कितीही त्रास दिला तरी ती तितकीच मजबूत आहे आणि तशीच मी आहे. मी बुलेटप्रूफ आहे.

हेही वाचा… बहीण आरती सिंहच्या संगीतदरम्यान कृष्णा अभिषेक-कश्मीरा शाहने केलं किस; व्हिडीओ व्हायरल

जुईच्या दुसऱ्या हातावर बेबी एंजलचा टॅटू आहे आणि त्याच टॅटूला जोडून मांजरीचे पाय आहेत. आईची तिच्या बाळांसाठीची काळजी दाखविणारा हा टॅटू आहे.

हेही वाचा… भाची आरती सिंहच्या लग्नात गोविंदा सहभागी होणार का? कश्मीरा शाह म्हणाली, “…मी त्यांच्या पाया पडेन”

दरम्यान, जुई गडकरीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, जुई सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकतेय. या मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीनं चाहत्यांना भुरळ घातलीय. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वाधिक टीआरपी असणारी मालिका ठरलीय.