लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांनीही छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेमुळे राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर हे पडद्यावरचे सहकलाकार खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकले. हार्दिक-अक्षयाने गेल्यावर्षी २ डिसेंबरला पुण्यात थाटामाटात लग्न केलं. आज लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त अक्षयाने खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : दिवसातून ८ तास चालणं, एकदाच जेवण अन्…; ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने केलंय तब्बल ५० किलो वजन कमी

अक्षया हार्दिक जोशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिते, “गेल्या ७ वर्षांपासून आपण एकमेकांबरोबर आहोत पण, आपल्या पहिल्या भेटीत आणि आजच्या दिवसात खूप फरत आहे. तो फरक म्हणजे आपल्यातील प्रेम.”

हेही वाचा : “आजवर छेड काढणाऱ्या ४ पोरांना धुतलंय…,” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “शाळेत असताना…”

“एकमेकांचे सहकलाकार ते आता आपण स्नूपीचे पालक आहोत. आपली हाय-हॅलोची मैत्री ते आज आपण एकमेकांबरोबर सगळं काही शेअर कतो. आपल्या नात्यात आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवरोबा!” असं अक्षयाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. अक्षयाने गेल्या ७ वर्षांतील अनेक फोटो या पोस्टबरोबर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी या पोस्टवर “राणादा अन् पाठकबाईंची जोडी खरंच भारी आहे”, “अंजली बाईंच्या राणादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” अशा कमेंट्स या पोस्टवर केल्या आहेत.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो

दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपल्यावर काही महिन्यांनी दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर गेल्यावर्षी दोघांनी लग्न केलं. अलीकडेच हार्दिक अक्षयाची पहिली मंगळागौर थाटामाटात संपन्न झाली. सध्या हार्दिक जोशी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tuzyat jeev rangla fame akshaya deodhar shares special birthday post for hardeek joshi sva 00
First published on: 06-10-2023 at 15:47 IST