टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येनंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. आपल्या दिलखुलास स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री वैशाली ठक्कर अशाप्रकारे आपलं आयुष्य संपवेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण एवढं गंभीर पाऊल तिने का उचललं याचा उल्लेख तिच्या सुसाइड नोटमध्ये तिने केला आहे. वैशालीच्या सुसाइड नोटमधून बरेच धक्कादाय खुलासे झाले असून यात दोन व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करण्यात आलं. या सुसाइड नोटमध्ये तिने तिच्या आई-बाबांसाठी मेसेज दिला आहे.

वैशाली ठक्करने १६ ऑक्टोबर दुपारी १२.३० वाजता इंदौरमधील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मात्र त्याआधी तिने तिच्या आई- वडिलांसाठी एक नोट लिहिली होती. ही नोट पोलीसांनी जप्त केली होती आणि त्याचबरोबर तिची खासगी डायरीही पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. त्यानंतर आता वैशालीच्या सुसाइड नोटमध्ये नेमकं काय लिहिलंय याबाबत जाणून घेण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत. वैशालीने तिच्या सुसाइड नोटमध्ये बरेच धक्कादायक खुलासे केले असून यात तिने तिचा शेजारी राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्यांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

kirit somaiya sanjay raut
“हिसाब तो देना पडेगा”, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कारवाईनंतर सोमय्यांचा राऊतांना टोला
ED Attaches Assets, more than Rs 73 Crore, patra chawl fraud case, pravin raut assests, Links to Sanjay Raut, marathi news, mumbai news, ed attaches pravin raut assests, ed, sanjay raut patra chawl, pratra chawl sanjay raut
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून ७३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, खासदार संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत यांच्या मालमत्तांचा समावेश
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

वैशालीने तिच्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं, “आई- बाबा आता खूप झालं… माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे आण मलाही खूप त्रास झाला आहे. फक्त मला माहीत आहे की या २ वर्षांमध्ये मी काय सहन केलं आहे आणि कशाविरुद्ध लढले आहे. राहुल नवलानीने माझ्याशी काय काय चुकीच्या गोष्टी केल्यात हे मी सांगूही शकत नाही. त्याने माझं मानसिक शोषण केलं आहे. माझा शारिरीक छळ केला आहे आणि अखेर त्याने जसं मला सांगितलं होतं की तो माझं लग्न होऊ देणार नाही हे शेवटी त्याने केलंच.”

आणखी वाचा- डिसेंबरमध्ये होतं वैशाली ठक्करचं लग्न, आत्महत्येच्या एक दिवस आधी मित्राला कॉल केला अन्…

वैशालीने पुढे लिहिलं, “आता तुमची मुलगीच राहणार नाही तर तिच्याशी संबंधित समस्याही राहणार नाहीत. मी आता सगळं संपवतेय आई. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. पण मला माफ करा मी एक चांगली मुलगी होऊ शकले नाही. तुम्ही राहुल आणि त्याच्या कुटुंबाला शिक्षा द्या. त्यांनी माझा मागची दोन अडीच वर्षे छळ केला आहे. तुम्ही त्यांना शिक्षा द्या नाही तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही खुश राहा. मितेशला मला माफ करण्यास सांगा. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. – वैशाली ठक्कर”

दरम्यान दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार वैशाली ठक्करने राहुल नवलानीवर गंभीर आरोप केले आहेत. राहुलने फसवणूक करून तिचे फोटो क्लिक करून तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवले होते. तिचा होणारा नवरा मितेश कॅलिफोर्नियामध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याआधी अभिनेत्रीचं लग्न केनियातील डेंटिस्ट सर्जन डॉ. अभिनंदनशी ठरलं होतं. मात्र नंतर ते काही कारणानं मोडल्याच्या चर्चा झाल्या होत्या.