दाक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणजे अक्कीनेनी नागार्जुन. नागार्जुनने त्याच्या अभिनयाने अनेकांच्या मनावर जादू केली आहे. त्याचे संपूर्ण जगभरात चाहते असल्याचे पाहायला मिळते. नागर्जुन त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना सांगतच असतो पण त्याप्रमाणे तो अनेकदा त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही उघडपणे बोलताना दिसतो. नागार्जुनच्या लव्ह लाईफबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नागुर्जुनने पहिली पत्नी लक्ष्मी डग्गुबतीसोबत वडिलांच्या सांगण्यावरुन लग्न केले होते.

नागार्जुन आणि लक्ष्मीने घरातल्यांच्या सांगण्यावरुन १९८४ साली लग्न केले. नागार्जुनचे वडिल नागेश्वर राव आणि लक्ष्मीचे वडिल रामानायडू डग्गुबती हे खूप चांगले मित्र होते. त्या दोघांनी त्यांच्या मुलांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला होता. लक्ष्मी आणि नागार्जुनचे लग्न झाले त्यावेळी नागार्जुन लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जात नव्हता. नागार्जुनला १९८६ मध्ये पूत्ररत्न झाला. त्याचे नाव नागा चैतन्य आहे. पण सतत होणाऱ्या भांडणामुळे नागार्जुन आणि लक्ष्मीने १९९० साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

 

View this post on Instagram

 

#Manmadhudu2diaries #Nagarjuna #Manmadhudu2

A post shared by Nagarjuna (@akkineni__nagarjuna) on

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचवेळी नागार्जुन अभिनेत्री अमालासोबत चित्रपटांमध्ये काम करत होता. त्यांनी ऐशीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी १९९२ मध्ये लग्न केले. १९९४ साली नागार्जुनला दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव अखिल अक्कीनेनी आहे.