सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटातून प्रेमातली गुंतागुंत विनोदी ढंगात उलगडणार आहे. उत्तम लेखन, अभिनय, संगीत असलेला, पुरेपूर मनोरंजन करणारा हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी ‘लास्ट स्टॉप खांदा… प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनित परुळेकरनी केलं आहे. चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचं छायांकन हरेश सावंत यांचं असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. संगीत श्रेयस राज आंगणे यांचे आहे, तर नृत्यदिग्दर्शन राहुल बनसोडे, रवी आखाडे यांचे आहे.
प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट ”लास्ट स्टॉप खांदा” या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. नावापासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटातलं ‘शालू झोका दे गो मैना’ या गाण्यासह शीर्षकगीतही लोकप्रिय ठरलं आहे. लहानपणापासून जिच्यावर प्रेम आहे, तिच्या प्रेमाखातर थांबलेल्या तरुणाची गोष्ट चित्रपटात आहे. तिचं मात्र दुसऱ्याच तरुणावर प्रेम आहे, अखेर तिच्या आयुष्यात प्रेमभंगाचा क्षण येतो आणि तीच एक संधी घेऊन नायक पुन्हा एकदा तिचं प्रेम मिळवण्याची खटपट करू लागतो. या प्रयत्नात तो यशस्वी होतो की नाही, याची मनोरंजक गोष्ट ‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
